TV9 च्या Dare2Dream अवॉर्ड्स सीझन 3 सोबत यश सेलिब्रेट करण्याची संधी, कसे सहभागी व्हाल?

मुंबई : भारतातील SME क्षेत्र हे देशातील विकास आणि रोजगाराचे प्रमुख चालक आहे. कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांनंतरही SME क्षेत्र अधिक मजबूत झाले आहे. गेल्या काही वर्षांत, एमएसएमई क्षेत्राने लक्षणीय वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे 2025 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी भारताच्या प्रयत्नांना गती मिळू शकते. एमएसएमई मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे 6.3 कोटी एमएसएमई […]

TV9 च्या Dare2Dream अवॉर्ड्स सीझन 3 सोबत यश सेलिब्रेट करण्याची संधी, कसे सहभागी व्हाल?
Dare2Dream
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 5:16 PM

मुंबई : भारतातील SME क्षेत्र हे देशातील विकास आणि रोजगाराचे प्रमुख चालक आहे. कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांनंतरही SME क्षेत्र अधिक मजबूत झाले आहे. गेल्या काही वर्षांत, एमएसएमई क्षेत्राने लक्षणीय वाढ नोंदवली आहे, ज्यामुळे 2025 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी भारताच्या प्रयत्नांना गती मिळू शकते. एमएसएमई मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे 6.3 कोटी एमएसएमई आहेत आणि ते एकत्रितपणे देशाच्या जीडीपीत सुमारे 29% योगदान देतात. देशाच्या एकूण निर्यातीपैकी 50% वाटा या क्षेत्राचा आहे. (Time to celebrate success with TV9’s Dare2Dream Awards Season 3. Know how to participate)

एसएमई क्षेत्र सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांमध्ये भरीव रोजगार निर्मिती करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे नेतृत्व करत आहे. भारतातील स्वदेशी उद्योगांचे यश साजरे करण्याची आणि आत्मनिर्भर भारताचे ध्वजवाहक बनलेल्या नवीन पिढीच्या उद्योजकांच्या कामगिरीचे कौतुक करण्याची हीच वेळ आहे.

TV9 नेटवर्क आणि SAP India Dare2Dream अवॉर्ड्सच्या तिसऱ्या हंगामासाठी एकत्र आले आहेत, जे महामारी-प्रेरित संकटाचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांचे यश ओळखतील. या व्यावसायिकांनी अशांत काळात नाविन्यपूर्ण पद्धती आणि डिजिटल परिवर्तनाचा अवलंब करून त्यांच्या संघटना यशस्वीपणे चालवल्या आहेत.

Dare2Dream अवॉर्ड्स अग्रगण्य व्यावसायिक आणि घरगुती उद्योगांना ओळखतील, जे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले योग्य पाऊल आहे. सर्व व्यवसाय मालकांना त्यांचे नाविन्यपूर्ण दृष्टीकोन, डिजिटल परिवर्तन, उत्पादन विकास धोरणे आणि यश मिळविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब दाखविण्याची ही संधी आहे.

पुरस्कारांचे विभाग (दोन विभागांमध्ये 15 कॅटेगरीमध्ये पुरस्कार दिले जातील)

  • 75 कोटी ते 150 कोटी रुपयांच्या दरम्यान वार्षिक उलाढाल असलेले उद्योग
  • 150 कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेला मिड-कॉर्पोरेट विभाग

कॅटेगरी

  • कंपनी ऑफ द इयर – क्षेत्रीय पुरस्कार (प्रत्येक विभागातील 8 ते 9 पुरस्कार)
  • वर्षभरातील उदयोन्मुख कंपनी
  • तंत्रज्ञानाद्वारे व्यवसाय परिवर्तन

प्रेरणादायी नेता

  • तरुण व्यावसायिक नेता
  • वर्षातील महिला उद्योजक
  • वर्षातील व्यावसायिक व्यक्ती

विविध TV9 नेटवर्क डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेबकास्ट करण्याबरोबरच भारतातील आघाडीची वृत्तवाहिनी TV9 Bharatvarsh वर पुरस्कार प्रसारित केले जातील.

Dare2Dream पुरस्कार सीझन 3 साठी नामांकन प्रक्रिया आता खुली आहे. भारतातील सर्व स्वदेशी उद्योग आणि उद्योजक या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. नामांकन 18 नोव्हेंबर 2021 रोजी बंद होईल.

सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा: https://growthmattersforum.com/new-launch/dare2dream-awards/

(Time to celebrate success with TV9’s Dare2Dream Awards Season 3. Know how to participate)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.