कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडायचंय? EMI पासून सुटकेसाठी ‘या’ टिप्स जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यांचा अवलंब करून तुम्ही लवकरात लवकर कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकता. तसेच तुमच्या EMI चा बोजा कमी करू शकता. चला जाणून घेऊया.

हल्ली लोकांच्या गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या खर्चातही लक्षणीय वाढ झाली आहे. आजकाल लोक आपल्या वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी कार लोन, घरासाठी होम लोन किंवा पर्सनल लोन अशा छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. अनेकदा एखादी व्यक्ती एकाच वेळी कर्ज घेते, ज्याचा परिणाम असा होतो की तो आपला EMI वेळेवर भरू शकत नाही आणि तो हळूहळू कर्जाच्या जाळ्यात अडकतो. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यांचा अवलंब करून तुम्ही लवकरात लवकर कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकता आणि तुमचा EMI चा बोजा कमी करू शकता. चला जाणून घेऊया.
खर्च कमी करा
तुम्हाला दर महिन्याला भरपूर EMI भरावा लागत असेल तर तुम्हाला तुमचा अवाजवी खर्च कमी करावा लागेल. महिन्याच्या सुरुवातीलाच बजेट बनवा आणि आवश्यक खर्चच करा. काही दिवस आपला छंद बंद करा आणि कर्जाचा EMI भरण्यावर लक्ष केंद्रित करा.




अधिक कमाई करा
कर्जाचा EMI वेळेवर भरण्यासाठी किंवा कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी आपले उत्पन्न वाढवा. यासाठी तुम्ही अतिरिक्त काम करू शकता किंवा दुसरी चांगली नोकरी शोधू शकता.
लोन रिफायनान्स करा
कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही लोन रिफायनान्स करू शकता. यामध्ये तुम्ही कमी व्याजदराने नवीन कर्जासह आपले जुने कर्ज फेडू शकता.
अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून पण तुम्ही तुमचा खर्च कमी करू शकता. आपण काही गोष्टी एकदम घेतल्यास आपल्याला खर्चही कमी लागतो. त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झाल्यास तुम्ही 10 रुपयांची एक साबण घेतल्यापेक्षा जर त्या साबणीचा पॅक घेतल्यास तुम्हाला त्यात सूट मिळू शकते. शिवाय तुमच्या घरात साबणीचा पॅक पडून राहील म्हणजे वारंवार खरेदीसाठी जाण्याची गरज नाही. तसेच तुमचे पैसे देखील वाचतील. अशा प्रकारे तुम्ही किराणा किंवा इतर बाबतीत देखील करू शकता. अशा प्रकारचा आराखडा देखील बनवून पैशांची बचत करता येते.
काही लोक वर्षाला एक EMI अतिरिक्त भरतात. यामुळे तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होऊ शकतो. अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून तुम्ही लवकर EMI मुक्त होऊ शकतात. तुम्हाला थोडे थोडे पैसे वाचवून फक्त अतिरिक्त कसे भरता येईल आणि कर्जाचे हप्ते कसे कमी करता येईल, याचा प्रयत्न करायचा आहे.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)