स्मार्ट परतफेड टाळेल कर्जाचा घोर

कोविडमुळे देशातील अनेक लोक वेळेवर कर्ज (Loan) फेडू शकले नाहीत आणि आता ते कर्जाच्या गर्तेत अडकण्याच्या भीतीत जगत आहेत. योग्य आर्थिक नियोजन केल्यास कर्जाचा बोजा जाणवणार नाही.

स्मार्ट परतफेड टाळेल कर्जाचा घोर
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 1:05 PM

आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI BANK) मते, स्मार्ट पद्धतीने कर्जाची परतफेड करण्याची योजना तयार केली तर कर्जाचा ईएमआय कधीही ओझे ठरणार नाही.कोविडमुळे देशातील अनेक लोक वेळेवर कर्ज (Loan) फेडू शकले नाहीत आणि आता ते कर्जात अडकण्याच्या चिंतेत जगत आहेत. कर्ज हा पैसा उभा करण्याचा नेहमीच सोपा मार्ग मानला जातो.आजच्या काळात कर्ज मिळणेही खूप सोपे झाले आहे, त्यामुळेच लोक विचार न करता कोणत्याही कर्जासाठी अर्ज करतात, मात्र, कर्ज घेण्याबरोबरच ते वेळेत फेडणेही गरजेचे आहे, ईएमआय वेळेत जमा केला नाहीतर कर्जाचा बोजा वाढत जातो आणि ग्राहक व्याजाच्या गर्तेत अडकतो. आयसीआयसीआय बँकेने अशा ग्राहकांना या कर्ज चिंतेतून बाहेर पडण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत. या टिप्स तुम्हाला तुमचं ईएमआय (EMI) लोन वेळेवर फेडायला मदत करतील.

कर्ज भरण्याला प्राधान्य द्या कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी, विशेषत: वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर कर्ज, ज्यात जास्त व्याज दर आहेत, ते लागू होण्यापूर्वी रक्कमेची तजवीज करावी लागेल. ईएमआयची तारीख आपल्या पगाराच्या तारखेच्या आसपास ठेवा. सोबतच आपल्या खात्यातील काही अतिरिक्त रक्कम पुढील ईएमआयसाठी राखीव ठेवा. एखाद्या वेळी पगार होण्यास उशीर झाल्यास अथवा नोकरी बदलण्याची गरज पडेल तेव्हा हप्ता चूकणार नाही तसेच दंडात्मक कारवाई होणार नाही.

एकाच वेळी कर्जाचा निपटारा करा तुम्ही सर्व क्रेडिट कार्डवर खरेदी करता आणि एखाद्या कार्डवर ईएमआय भरण्यास उशीर होतो. क्रेडिट कार्डमध्ये तुम्ही अनेक वेगवेगळे ईएमआय भरत असाल तर तुम्ही पर्सनल लोन घेऊन त्या सर्वांची परतफेड केलेली बरी. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कर्जाचे व्यवस्थापन सहजपणे करू शकाल, तर वैयक्तिक कर्जाच्या मदतीने क्रेडिट कार्डवरील चढ्या व्याजदरापासूनही तुमची सुटका होईल

शिल्लक हस्तांतरण कर्ज घेतल्यानंतर त्याचा सतत आढावा घेत राहा. इतरत्र चांगले दर आणि चांगल्या अटींसह कर्ज ऑफर मिळत असेल तर बॅलन्स ट्रान्सफरची संधी हातातून जाऊ देऊ नका. अनेकदा असे दिसून येते की जर लोक ईएमआय भरण्यास सक्षम असाल तर ते त्यांच्या कर्जाचा आढावा घेण्याऐवजी ईएमआय भरणे पसंत करतात. परंतु, यामुळे आपण खर्च कमी करण्याची आपली संधी गमावता. सतत बाजारात येणाऱ्या ऑफर्सवर लक्ष ठेवा. कर्जाचा भार कमी करण्यासाठी कोणत्याही ऑफरचा लाभ घेणे चांगले ठरते.

कर्जाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा लोकांचे अतिरिक्त उत्पन्न असते. पण त्याचा वापर ते जीवनावश्यक नसलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी करतात. जर तुमचे कर्ज चालू असेल आणि इतर ठिकाणांहून तुम्ही कमाई करत असाल तर त्याच्या मदतीने तुमचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा.. यामुळे तुम्ही व्याजदराच्या ओझ्यातून लवकर मुक्त व्हाल.

Budget 2022 : अर्थसंकल्पात दिलासा नाही ; शेवटी बचत पण तर आहे कमाई

BUDGET 2022: चुकीला माफी, पण दंड भरुन..! आयटीआर नियमात बदल, ‘ही’ अट महत्वाची

Union Budget 2022 Share market : ‘हे’ स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओत असालयाच हवेत, ‘या’ पाच क्षेत्रातील शेअर तुम्हाला करतील मालामाल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.