Today gold, silver Rate: आतंरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; काय आहे भारतातील स्थिती? जाणून घ्या एका क्लिकवर
रेपो रेट वाढ आणि महागाईच्या दबावामुळे गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Price) घसरल्याचे पहायला मिळत आहेत. चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण झाली आहे.
नवी दिल्ली : गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Price) घसरल्याचे पहायला मिळत आहे. सध्या अमेरिकेत महागाईने (Inflation) उच्चांक गाठला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचा परिणाम हा सोन्याच्या दरावर झाल असून, गुंतवणूकदार संभ्रम अवस्थेत आहेत. परिणामी सोन्याचे दर कमी झाले आहेत. दरम्यान येणाऱ्या काळात अमेरिका आपल्या रेपो रेटमध्ये (Repo rate) आणखी वाढ करू शकते. यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण होऊन सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. आज जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार सोन्याच्या दरात 0.4 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीसह जागतिक बाजारात सोन्याचे दर हे 1,728.39 डॉलर प्रति औसवर पोहोचले आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून, चांदीचे दर हे 19.11 डॉलर प्रति औस इतके आहेत. पुढील काही दिवस सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच राहू शकते असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
भारतातील सोन्याचे दर
भारतामध्ये मात्र सोन्याच्या दरात किंचित तेजी पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा 200 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 46,700 रुपये इतके होते. आज त्यामध्ये 200 रुपयांची भर पडली असून, सोन्याचे दर प्रति तोळा 46,900 रुपयांवर पोहोचले आहेत. दुसरीकडे 24 कॅरट सोन्याच्या दरात देखील आज 210 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 50,950 रुपये इतके होते. तर आज 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,160 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच आज सोनं 210 रुपयांनी वधारले आहे. तर चांदीच्या दरात देखील किलोमागे 600 रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी चांदीचे दर प्रति किलो 56,400 रुपये इतके होते. तर आज चांदीचे दर प्रति किलो 57,000 रुपयांवर पोहोचले आहेत.
राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर
आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46900 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51160 रुपये इतके आहेत. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46970 इतके असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51180 रुपये इतके आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46970 रुपये एवढे आहेत, तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51180 रुपयांवर पोहोचले आहेत. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46970 रुपये एवढे असून 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51180 रुपये एवढे आहेत. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46950 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51160 रुपये एवढे आहेत.