Tomato Price : टोमॅटो घ्या अर्ध्या किंमतीत! भाव इतका स्वस्त, या राज्य सरकारवर कौतुकाचा वर्षाव

Tomato Price : देशात टोमॅटोच्या भावाने ग्राहक लालबुंद झाले आहेत. पण या राज्य सरकारने अर्ध्या किंमतीत टोमॅटोचा पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे या राज्य सरकारवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. 

Tomato Price : टोमॅटो घ्या अर्ध्या किंमतीत! भाव इतका स्वस्त, या राज्य सरकारवर कौतुकाचा वर्षाव
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 1:47 PM

नवी दिल्ली : टोमॅटोच्या किंमतींनी (Tomato Price) पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या नाकात दम आणला आहे. अलनीनोचा मोठा प्रभाव यंदा देशभरात दिसत आहे. कमी उत्पादनामुळे टोमॅटोचा भाव गगनाला पोहचले आहेत. दलाल आणि मध्यस्थांवर अंकुश ठेवण्यात राज्य आणि केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. टोमॅटो 120-160 रुपये किलो दराने विक्री होत आहे. पाकिस्तानला नावं ठेवता ठेवता भारतात ही कृत्रिम महागाईने (Inflation) जनतेचा घात केला आहे. त्यांच्या दिवसा खिसा कापल्या जात आहे. पण केंद्र सरकार या प्रकरणी हतबल झाल्याचे बाजारातील चित्र स्पष्ट करते. पण या राज्य सरकारने जनतेला अर्ध्या किंमतीत टोमॅटो (Tomato Half Price) उपलब्ध करुन दिले आहे. या राज्य सरकारवर भारतातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

इथे महाग, या शहरात सर्वात स्वस्त भारतात टोमॅटोचा सरासरी दर गुरुवारी 95.58 रुपये प्रति किलोग्रम होता. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे टोमॅटोचा भाव भारतात सर्वाधिक म्हणजे 162 रुपये प्रति किलोमग्रॅम होता. तर राजस्थानमधील चुरु येथे टोमॅटो 31 रुपये किलोने विक्री होत आहे.

या शहरात असा आहे भाव (प्रति किलो)

हे सुद्धा वाचा
  • मुंबई 108 रुपये
  • चेन्नई 117 रुपये
  • दिल्ली 120 रुपये
  • कोलकाता 152 रुपये
  • हैदराबाद 98 रुपये
  • बेंगळुरु 110 रुपये

तामिळनाडू पॅटर्न तामिळनाडू राज्यात सध्या टोमॅटोचा किरकोळ भाव 120 ते 160 रुपये प्रति किलो या दरम्यान आहे. टोमॅटोच्या किंमतींवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे. पण सर्वसामान्य जनतेला स्वस्तात टोमॅटो मिळावा यासाठी राज्य सरकारने खास योजना आखली आहे.

राशन दुकानावर टोमॅटो तामिळनाडू सरकारने राशन दुकानावर टोमॅटो स्वस्तात उपलब्ध करुन देण्यास मंजूरी दिली आहे. त्यानुसार, आता स्वस्त धान्य दुकानावर टोमॅटो 60 रुपये किलो भावाने मिळेल. मंगळवारपासून चेन्नईतील अनेक स्वस्त धान्य दुकानावर स्वस्तात टोमॅटो विक्रीला सुरुवात करण्यात आली.

अशी झाली सुरुवात पहिल्या टप्प्यात राजधानी चेन्नईतील तीन विभागात ही योजना सुरु झाली. उत्तर, दक्षिण आणि मध्य चेन्नईतील स्वस्त धान्य दुकानात अर्ध्या किंमतीत टोमॅटो उपलब्ध करुन देण्यात आले. फार्म ग्रीन सेंटरवर पण स्वस्तात टोमॅटो मिळत आहे. तामिळनाडूमध्ये सहकारी समितीच्या दुकानांची संख्या वाढविण्यात आली असून त्याठिकाणी अर्ध्या किंमतीत टोमॅटो मिळत आहे. लवकरच योजना राज्यात सुरु करण्याचा शक्यता आहे.

अल-नीनो मुळे गणित बिघडले अलनीनोमुळे सध्या भारतीय पिकांचं आणि उत्पादनाचं गणित बिघडलं आहे. त्याचा विपरीत परिणाम भारतीय शेती आणि शेतकऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टोमॅटो उत्पादनाला फटका बसला आहे. तर काही ठिकाणी व्यापारी साठेबाजी करत असल्याची ओरड होत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.