Top Multibagger Stock: गेल्या आर्थिक वर्षात ‘या’ कंपनीच्या शेअर्सने दिला सर्वाधिक 3, 381.71 टक्क्यांचा परतावा

गुरुवारी शेअर बाजाराचे अंतिम सत्र संपले आणि सोबतच आर्थिक वर्ष देखील. आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये रशिया- युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारावर (Share Market) दबाव पाहायला मिळाला. मात्र तरी देखील काही कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगली तेजी दिसून आली.

Top Multibagger Stock: गेल्या आर्थिक वर्षात 'या' कंपनीच्या शेअर्सने दिला सर्वाधिक 3, 381.71 टक्क्यांचा परतावा
शेअर बाजार
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 7:27 AM

Top Multibagger Stock : गुरुवारी शेअर बाजाराचे अंतिम सत्र संपले आणि सोबतच आर्थिक वर्ष देखील. आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये रशिया- युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारावर (Share Market) दबाव पाहायला मिळाला. शेवटचे काही महिने सोडले तर गेल्या वर्षी शेअर बाजारामधून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. बीएसई सेंसेक्स (BSE Sensex) आणि एनएसई निफ्टीमध्ये (NSE Nifty) चांगली तेजी पहायला मिळाली. गेल्या आर्थिक वर्षामध्ये बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये वाढ होऊन ती 263.91 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 60 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2011 साली शेअर मार्केटची एकूण कॅप 204.31 लाख कोटी इतकी होती. गेल्या वर्षी अशा अनेक कंपन्या होत्या की त्यांच्या शेअर्सने चांगला परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल बनवले. Cosmo Ferrites ने यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा दिला आहे.

गुंतवणूकदार बनले मालामाल

Cosmo Ferrites यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देणारा शेअर ठरला आहे. गेल्या वर्षी 31 मार्चला या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघी 17.50 रुपये होती. गुरुवारी संपलेल्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2022 रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत वाढून 609.30 रुपयांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात 31 मार्च 2021 ते 31 मार्च 2022 या बारा महिन्याच्या कालावधीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 3,381.71 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

शेअर बाजाराची वाटचाल

गेल्या वर्षभरात शेअर बाजाराची वाटचाल कशी राहिली याचा आढावा घ्यायचे ठरल्यास मागील वर्ष गुंतवणूकदारांसाठी चांगले राहिले असे म्हणण्यास हरकत नाही. गेल्या वर्षभरात शेअर बाजाराचा सेंसेक्स 18.53 टक्क्यांनी वाढला. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे 19.11 व 19.11 टक्क्यांनी वाढली. बीएसईच्या 566 शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. मात्र या सर्वांमध्ये Cosmo Ferrites बाजी मारत यावर्षी गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा दिला. पुढील काळात देखील या शेअर्समध्ये तेजीचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

संबंधित बातम्या

सौदी अरेबिया कच्च्या तेलाचे दर वाढवणार; सर्वाधिक फटका आशियाई देशांना बसणार

1 एप्रिलला हलक्यात घेऊ नका! 1 एप्रिलपासून बजेट कोलमडण्याची दाट शक्यता, काय काय महागणार?

Petrol Prices: जगात जर्मनी भारतात परभणी, पेट्रोलचे सर्वात महाग पेट्रोल परभणीत का? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.