व्हाट्सअॅपद्वारे लाखो कमवा, फक्त व्यवसायाच्या भिंगाने बघा, वाचा कसं?
आम्ही तुम्हाला व्हाट्सअॅप बिझनेस हे फिचर्स आणि त्याच्याशी संबंधित टूल्सबाबत माहिती देणार आहोत. या माहितीच्या आधारावर तुम्हीदेखील चांगल्याप्रकारे व्यवसाय करु शकता (Try WhatsApp business and increase your income).
मुंबई : व्हाट्सअॅप हे आता अनेकांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलं आहे. विशेष म्हणजे व्हाट्सअॅपच्या एका अॅपच्या माध्यमातून तुम्ही स्वत:चा व्यवसायही चांगल्याप्रकारे करु शकतात. तुम्ही तुमचे प्रोडक्ट या अॅपच्यामार्फत अनेकांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला व्हाट्सअॅप बिझनेस हे फिचर्स आणि त्याच्याशी संबंधित टूल्सबाबत माहिती देणार आहोत. या माहितीच्या आधारावर तुम्हीदेखील चांगल्याप्रकारे व्यवसाय करु शकता (Try WhatsApp business and increase your income).
WhatsApp Business अॅप नेमकं आहे तरी काय?
फेसबुकच्या ब्लॉग पोस्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, WhatsApp Business हे अॅप छोट्या व्यवसायिकांना लक्षात ठेवूनच बनवण्यात आलं आहे. या अॅपला मोफत डाऊनलोड करता येऊ शकतं. या अॅपद्वारे ग्राहकांशी चांगलं नातं प्रस्थापित करता येऊ शकतं. या अॅपवर ग्राहकांच्या आलेल्या मेसेजला ऑटोमॅटिकली तातडीने रिप्लाय देण्याचा एक टूल आहे. तो टूल अॅक्टिवेट केला तर ग्राहकांचं प्रोडक्ट संबंधित शंकांचं लगेच निरसन होईल. या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता (Try WhatsApp business and increase your income).
WhatsApp Business प्रोफाईल कसं बनवाल?
WhatsApp Business प्रोफाईल बनवायचं असेल तर सर्वात आधी Google Play Store आणि Apple App Store येथून WhatsApp Business हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर सर्व सेवा आणि अटी-शर्ती वाचावे. या सर्व अटी वाचल्यानंतर त्या स्वीकार कराव्या आणि पुढे जायचं. यानंतर आपला राष्ट्र कोड जोडण्यासाठी ड्रॉप-डाऊन सूचीमध्ये आपल्या देशाचं नाव निवडा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फोन नंबर फॉर्मेटमध्ये आपला नंबर भरा आणि पुढे ओकेच्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सहा अंकी रजिस्टर कोडचा मेसेज येईल. हा कोड WhatsApp Business अॅपवर अपडेट करा.
या अॅपवर तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नाव टाकण्याबरोबरचं त्याबाबतची सविस्तर माहिती देखील टाकू शकतात. तुमचा व्यवसाय दिवसभरात कोणत्या वेळेत सरु असतो याबाबतची माहितीदेखील तुम्ही त्यात भरु शकतात. याशिवाय तुम्ही तुमचा पत्ता, ई-मेल आयडी आणि वेबसाईटची माहिती टाकू शकतात.
कॅटलॉग सेट करुन तुमच्या प्रोडक्टची माहिती द्या
तुम्ही तुमच्या बिझनेस अकाउंटमध्ये कॅटलॉग देखील सेट करु शकतात. तुम्ही तुमच्या प्रोडक्टची माहिती, त्यासंबंधित लिंक, फोटो, किंमत, आयटम कोड आणि डिस्क्रिप्शनदेखील टाकू शकतात. अॅपवर एवढी सगळी माहिती टाकल्यानंतर ग्राहकांनी थेट शॉपिंग बटनवर क्लिक केलं की तुमच्या प्रोडक्टची A to Z माहिती ग्राहकांना मिळेल.
याशिवाय तुम्ही कामात असताना एखाद्या ग्राहकाने तुम्हाला मेसेज केला तर तरी चिंता करण्याची फारशी आवश्यकता नाही. कारण तुम्ही Away Message सेट करु शकतात. त्याचबरोबर तुम्ही ऑटोमॅटिकली ग्राहकांना ग्रिटिंग्सचे मेसेज आणि क्विक रिप्लायची सेटिंग करु शकतात. त्यामुळे तुम्हाला दरवेळी मेसेजला स्वत:हून रिप्लाय देण्याची आवश्यकता नाही.
शॉर्ट लिंकचा वापर करा
व्हाट्सअॅपच्या सेटिंगमध्ये शॉर्ट लिंक नावाचं ऑप्शन असतं. तिथे बिझनेस प्रोफाईलची शॉर्ट लिंक असते. ती लिंक कॉपी करुन तुम्ही तुमच्या ग्राहकांना पाठवू शकतात. त्यामुळे आणखी जास्त लोकांपर्यंच तुमचा व्यवसाय पोहोचेल.
विविध सोशल मीडिया अकाउंटशी कनेक्ट करा
तु्म्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्ही फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साईटवर बिझनेसची माहिती देऊ शकतात. तुमच्या प्रोडक्टची माहिती, फोटो टाकू शकतात. विशेष म्हणजे तुमच्या बिझनेस अॅपसोबत हे सोशल मीडिया अकाउंट तुम्ही कनेक्ट करु शकतात. याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल.
हेही वाचा : Money Making Tips: करोडपती होण्याचा सोपा मार्ग, दिवसाला 30 रुपये गुंतवून व्हा मालामाल