AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT 2025: जगाला जाणून घ्यायचंय व्हाट इंडिया थिंक टुडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं भाष्य

जगातील सर्वात जास्त तरुण आपल्या देशात आहे. हे तरुण स्किल्ड होत आहे. इनोव्हेशनला गती देत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2025' कार्यक्रमात म्हणाले.

WITT 2025: जगाला जाणून घ्यायचंय व्हाट इंडिया थिंक टुडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं भाष्य
Follow us
| Updated on: Mar 28, 2025 | 7:46 PM

देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्कने Tv9ने आपल्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2025’ कार्यक्रमाचे आज, २८ मार्च रोजी आयोजन केले होते. हा कार्यक्रम २ दिवस चालणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील व्यक्तींपासून ते मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज देखील सहभागी होणार आहेत. प्रत्येकजण वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते मांडतील. या समिटला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जगाला जाणून घ्यायचंय व्हाट इंडिया थिंक टुडे’ असे वक्तव्य केले.

सात आठ वर्षात पाचव्या नंबरची इकोनॉमी

‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2025’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज जगाची नजर भारतावर आहे. आपल्या देशावर आहे. जगात तुम्ही कोणत्याही देशात जा, तिथले लोक भारताबाबत उत्सुक असतात. असं काय झालं की जो देश ७० वर्षात ११ व्या नंबरची इकोनॉमी होती. आता सात आठ वर्षात पाचव्या नंबरची इकोनॉमी बनला आहे. आता आयएमएफचे नवीन आकडे समोर आले आहेत. ते आकडेच सांगतात की, भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी आहे. ज्यांनी १० वर्षात आपल्या जीडीपीला डबल केलं आहे.’

२५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले

मागच्या दशकात भारताने २ लाख कोटी डॉलर आपल्या इकोनॉमीत जोडले आहेत. जीडीपी डबल होणं म्हणजे केवळ आकडे बदलणे नाही. त्याचा इम्पॅक्ट पाहा. २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. आणि हे २५ कोटी लोक एक न्यूओ मिडल क्लासचा हिस्सा झाले. हा न्यूओ मिडल क्लास नवीन आयुष्य सुरू करत आहे. नव्या स्वप्नांना घेऊन जात आहे. आपल्या इकोनॉमीत योगदान देत आहे. त्याला व्हायब्रंट करत आहे अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

जगातील सर्वात जास्त तरुण आपल्या देशात आहे. हे तरुण स्किल्ड होत आहे. इनोव्हेशनला गती देत आहे. त्यामध्ये भारताच्या फॉरेन पॉलिसीचा मंत्र झाला इंडिया फर्स्ट. एकेकाळी भारताची पॉलिसी होती, सर्वांपासून समान अंतराव राहण्याची. आजच्या भारताची पॉलिसी आहे सर्वांसोबत जवळ जाऊन चला. सर्वांना सोबत घेऊन चला. जगातील देश भारताची ओपिनियन, भारताचे इनोव्हेशन आणि भारताच्या एफर्टला महत्त्व आज देत आहेत. तसं पूर्वी कधीच झालं नाही. आज जगाची नजर भारतावर आहे. आज जगाला जाणून घ्यायचंय व्हाट इंडिया थिंक टुडे.

'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.