UAN : युनिव्हर्सल अकाउंट नंबर विसरलात, जाणून घ्या रिकव्हर करण्याचा सोपा मार्ग

UAN युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) कसा मिळवायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते ओळखण्यासाठी तो वापरला जातो. हा 12-अंकी क्रमांक असतो. जो कर्मचाऱ्याने कितीही वेळा नोकरी बदलली तरीही नंबर तोच राहतो. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून पैसे जमा आणि काढू शकता.

UAN : युनिव्हर्सल अकाउंट नंबर विसरलात, जाणून घ्या रिकव्हर करण्याचा सोपा मार्ग
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 4:30 PM

UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) यांच्याकडून दिला जातो. जी तुमची ओळख असते. या नंबरवरुन तुम्ही पीएफमधील शिल्लक पासबुकच्या मदतीने तपासू शकतात. या शिवाय तुम्ही वेगवेगळे कंपन्याचे पीएफ बॅलेन्स नव्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करु शकतात. पण जर तुम्हाला तुमचा यूएएन नंबर माहित नसेल तर तुम्हाला कोणतीही माहिती मिळू शकणार आहे. तुम्ही तुमच्या EPFO ​​खात्यात प्रवेश देखील करू शकणार नाही. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला UAN शोधण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमचा UAN गरजेच्या वेळी कळू शकेल.

UAN म्हणजे काय?

युनिव्हर्सल अकाउंट नंबरचा वापर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाते ओळखण्यासाठी केला जातो. हा 12-अंकी क्रमांक असतो. कर्मचाऱ्यासाठी त्याच्या यूएएन नंबर कंपनी बदलली तरी सारखाच राहतो. तो कितीही वेळा नोकरी बदलली तरी तो बदलत नाही. कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे जमा आणि काढू शकतात. त्याच्या मदतीने, पीएफ खाते विलीन किंवा रद्द देखील केले जाऊ शकते.

UAN कसा मिळवायचा?

जर तुम्ही ईपीएफओच्या अखत्यारीत येणाऱ्या कंपनीत काम करत असाल तर नोकरीत रुजू झाल्यानंतर ते तुमचे पीएफ खाते उघडेल आणि तुम्हाला यूएएन नंबर देईल. हे फक्त प्रथमच नोकरीत सामील झालेल्यांसाठी आहे. तुम्ही नोकरी बदलल्यास, नवीन कंपनीमध्ये तुमचे नवीन पीएफ खाते उघडले जाईल. UAN क्रमांक पूर्वीसारखाच राहील. तुम्ही UAN च्या मदतीने ते विलीन करू शकता.

तुम्ही UAN विसरलात तर?

UAN 12 अंकी असतो. जर तुम्ही तो कुठे सांभाळून ठेवला नसेल तर तुम्हाला UAN पुनर्प्राप्त करण्याची पद्धत देखील आम्ही सांगणार आहोत.

  • UAN वेबसाइटला भेट द्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/.
  • उजव्या बाजूला दिसणाऱ्या महत्त्वाच्या लिंक्सवर जा आणि Know your UAN वर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि विनंती OTP वर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल. OTP आणि captcha code टाका आणि Validate OTP वर क्लिक करा.
  • आता पूर्ण नाव, जन्मतारीख, आधार किंवा पॅन आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि शो माय यूएएन वर क्लिक करा.
  • शो माय यूएएन वर क्लिक करताच तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर स्क्रीनवर दिसेल.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.