नवी दिल्ली: कोरोना लसीकरणामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं म्हणून केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. भारतात सध्या कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी लसीचे डोस देण्यात येत आहेत. लसीकरणाला चालना देण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या आहेत. युको बँकेने लस घेणाऱ्यांसाठी मुदत ठेवीवर व्याज वाढवून देण्यात येणार आहे. युको बँकेने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. ग्राहक या सुविधेचा फायदा 30 सप्टेंबर पर्यंत घेऊ शकतात. (UCO Bank declare extra interest rate on fixed deposit who take corona vaccine)
युको बँकेने कोरोना लसीकरणाला प्रोस्ताहन देण्यासाठी UCOVAXI-999 ही मुदत ठेव ऑफर जारी केली आहे. ग्राहक या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत मुदत ठेव ठेवण्यात येणार आहे.
>> मुदत ठेव ठेवणाऱ्या ग्राहकांना वार्षिक 5.3 टक्के व्याज दर मिळेल
>> कमीत कमी 5 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल
>> जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची गुंतवणूक करता येईल.
>> या ठेवीवर कर्ज काढता येईल.
>> मुदत ठेव कालावधी पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतील
Are you #vaccinated? #UCOBank introduces #UCOVAXI999, an attractive Fixed Deposit Scheme for the Vaccinated Individuals! Contact nearby Branch for details! T&C Apply! pic.twitter.com/D0rAlDOwQ6
— UCO Bankᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠ (@UCOBankOfficial) June 7, 2021
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) ने देखील कोरोना लस घेणाऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरु केली आहे. या अंतर्गत जे लोक मुदत ठेव ठेवतील त्यांना 0.25 टक्के व्याज दिलं जाईल. ‘इम्यून इंडिया डिपॉजिट स्कीम’ (Immune India Deposit Scheme) असं त्या योजनेचं नाव आहे. मुदत ठेव कालावधी 1,111 दिवसांचा आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता कोव्हिडची साथ नियंत्रणात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण, गेल्या 24 तासांमध्ये देशभरात अवघ्या 86,498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus) शिगेला असताना देशात प्रत्येक दिवशी चार लाखांच्या आसपास नवे रुग्ण सापडत होते. मात्र, आता हे प्रमाण एक लाखापेक्षा कमी झाल्याने ही भारताच्यादृष्टीने दिलासादायक बाब मानली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या आकेडवारीनुसार सोमवारी दिवसभरात देशभरात 86,498 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2123 जणांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या:
…म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायत, पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले कधी होणार स्वस्त?
Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याचे दर जाणून घ्या
(UCO Bank declare extra interest rate on fixed deposit who take Corona vaccine)