आता फोनमध्येच ठेवा 5 जणांचं Aadhaar, UIDAI ने आणली खास सुविधा
या अॅपला डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कागदी 'आधार कार्ड' वापरण्याची किंवा सोबत बाळगण्याची गरजच भासणार नाही.
नवी दिल्ली : सध्याच्या सगळ्या महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये आधार कार्ड (Aadhaar Card)आवश्यक आहे. अशात डिजिटलायझेनश लक्षात घेता सरकारनेही नागरिकांच्या सोयीसाठी mAadhaar हा अॅपची सुविधा केली आहे. या अॅपला डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कागदी ‘आधार कार्ड’ वापरण्याची किंवा सोबत बाळगण्याची गरजच भासणार नाही. UIDAI ने यासंबंधी ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या अॅपमध्ये 5 प्रोफाइल जोडू शकता. (uidai aadhaar card update now you can add 5 profiles in your maadhaar app here is details)
UIDAI नेकलं ट्वीट
UIDAI ने याविषयी एक ट्वीट करून माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता तुम्ही आधारचे 5 प्रोफाईल तुमच्या mAadhaar अॅपमध्ये जोडू शकता. आधी फक्त 3 प्रोफाईल जोडण्याचीच सुविधा होती. पण आता ग्राहकांच्या सोयीसाठी यामध्ये बदल करण्यात आला आहे.
mAadhar अॅपला तुम्ही गुगल स्टोरमधून डाऊनलोड करू शकता. यामध्ये प्रोफाईल जोडताना एक गोष्ट लक्षात असुद्या की, तुम्ही पाचही आधार कार्डमध्ये तोच नंबर भरला पाहिजे जो तुम्ही फोनमध्ये वापरता. इतकंच नाहीतर तुम्ही फक्त 5 प्रोफाईल जोडू शकता पण वापरताना तुम्ही एकावेळी एकच वापरू शकता.
कसं जोडणार आधार प्रोफाईल –
– सगळ्यात आधी अॅपला फोनमध्ये डाऊलोड करा
– आता 12 डिजिट आधार नंबर भरा
– यानंतर विचारलेली माहिती भरून वेरिफाय करा.
– आता रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी विचारला जाईल. तो भरा.
– यानंतर तुमचं आधार प्रोफाईल तयार असेल.
कसं डिलीट करणार प्रोफाईल –
– आधार अॅपवर प्रोफाईल उघडा आणि वरच्या उजव्या मेनूवर क्लिक करा.
– डिलीट प्रोफाईल पर्याय निवडा.
– यानंतर तुमचे प्रोफाइल अॅपमधून डिलीट होईल.
किती भाषांमध्ये आहे सुविधा…
या अॅपमध्ये तुम्हाला 12 वेगवेगळ्या भाषांची सुविधा देण्यात आली आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी या महत्त्वाच्या भाषांनंतर आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू भाषेतही सुविधा उपलब्ध आहेत. (uidai aadhaar card update now you can add 5 profiles in your maadhaar app here is details)
संबंधित बातम्या –
Petrol Price Today : आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या का? वाचा आजचे दर
तुम्हालाही पॅनकार्डवरचा फोटो बदलायचा आहे?, ही आहे सगळ्यात सोपी पद्धत
SBI देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना?
Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर
(uidai aadhaar card update now you can add 5 profiles in your maadhaar app here is details)