Ukraine Russia war: सोने हजार रुपयांनी महागले, चांदीच्या दरातही वाढ

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा आठवा दिवस आहे. युद्धामुळे केवळ मनुष्य आणि वित्तहानीच झाली नाही तर आंतराष्ट्रीय बाजारपेठेवर देखील या युद्धाचा मोठा परिणाम पहायला मिळत आहे. सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल एक हजारांनी वाढ झाली आहे.

Ukraine Russia war: सोने हजार रुपयांनी महागले, चांदीच्या दरातही वाढ
जाणून घ्या आजचे सोन्याचे दरImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 10:37 AM

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine)  युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा आठवा दिवस आहे. युद्धामुळे केवळ मनुष्य आणि वित्तहानीच झाली नाही तर आंतराष्ट्रीय बाजारपेठेवर देखील या युद्धाचा मोठा परिणाम पहायला मिळत आहे. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर चांगलेच कडाडले आहेत. भारतामध्ये देखील मौल्यवान धातुच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. भारतता आज दहा ग्रॅम अर्थात एक तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत (Gold Rate) ( 47700 रुपयांवर पोहोचली आहे. बुधवारी 22 कॅरट सोन्याचा दर 46690 इतका होता याचाच अर्थ आज सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल एक हजारांची वाढ झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती सतत बदलत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये देखील वाढ झाली असून, चांदी प्रति किलो 67 हजार 200 रुपयांवर पोहोचली आहे.

काय आहे आजचे दर?

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47700 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 52040 एवढे आहेत. पुण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 47780 एवढी आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 50140 रुपये इतकी आहे. तर नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47800 इतकी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 50,140 इतकी आहे. चांदीच्या दरामध्ये देखील 672 रुपयांची वाढ झाली असून, चांदीचे दर प्रति किलो 67 हजार 200 रुपयांवर पोहोचले आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये देखील वाढ

रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम हा केवळ मौल्यवान धातुंवरच नव्हे तर कच्च्या तेलाच्या किमतीवर देखील झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती तब्बल पाच टक्क्यांनी वाढल्या असून, कच्चे तेल 118 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. आणखी काही दिवस अशीच तणावपूर्ण परिस्थिती राहिल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेल महागल्याने सर्वच वस्तू महाग होऊ शकतात.

संबंधित बातम्या

कच्च्या तेलाच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा पेट्रोल, डिझेलचा भाव

Russia-Ukraine war, बाजारपेठेवर अनिश्चिततेचे सावट; महागाई भडकण्याची शक्यता

रशिया – युक्रेन युद्धाबाबत अर्थमंत्र्यांची चिंता; अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.