Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FACT CHECK: युवकांच्या खात्यात 4 हजार, केंद्राची रामबाण सुरक्षा योजना; वाचून घ्या नेमकं तथ्य काय?

वेबसाईटवरील लिंकच्या माध्यमातून योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेच्या नावावरुन केंद्रान युवक कल्याण योजना (YOUTH WELFARE SCHEME) हाती घेतल्याचं प्रथमदर्शनी जाणवतं.

FACT CHECK: युवकांच्या खात्यात 4 हजार, केंद्राची रामबाण सुरक्षा योजना; वाचून घ्या नेमकं तथ्य काय?
केंद्राची रामबाण सुरक्षा योजना; वाचून घ्या नेमकं तथ्य काय?Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 7:15 PM

नवी दिल्ली: डिजिटल फसवणुकीच्या घटनांच्या संख्येत अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फसव्या माहितीच्या जाळ्यात ओढून अनेकांना लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. सध्या केंद्र सरकारच्या (CENTRAL GOVERNMENT) एका योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक युवकाला अनुदान दिले जात असल्याची माहिती व्हायरल होत आहे. एका वेबसाईटच्या माध्यमातून ‘प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजने’ (PM RAMBAN SURAKSHA YOJNA)च्या अंतर्गत तरुणाला 4000 हजार रुपये अनुदान देण्याचा दावा केला जात आहे. वेबसाईटवरील लिंकच्या माध्यमातून योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेच्या नावावरुन केंद्रान युवक कल्याण योजना (YOUTH WELFARE SCHEME) हाती घेतल्याचं प्रथमदर्शनी जाणवतं. मात्र, योजना पूर्णपणे फसवी असल्याचं स्पष्ट झालं आहे. युवकांच्या कल्याणाऐवजी त्यामाध्यमातून युवकांची फसवणूक सुरू होत असल्याचं सिद्ध झालं आहे. केंद्रानं अशाप्रकारची योजना पूर्णपणे फेटाळली आहे.

काय आहे दावा?

पीआयबीनं बनावट वेबसाईटचं सत्य समोर आणलं आहे. प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेच्या माध्यमातून केला जाणारा दावा पूर्णपणे ङोटा आहे. पीआयबीनं ट्विटद्वारे वैयक्तिक गोपनीय माहिती सार्वजनिक न करण्याचा सल्ला दिला आहे. चुकीच्या माहितीला सामोरे न जाता फसवणूक टाळण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच केंद्राच्या अखत्यारितील माध्यम संस्था पीआयबीनं सत्यशोधनाच्या द्वारे वेबसाईट पूर्णपणे बनावट असल्याचं म्हटलं आहे.

फसवणुकीचं चक्रव्यूव्ह

योजनेचा दावा करणारी लिंकच्या माध्यमातून ग्राहकाला लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन केलं जातं. लिंक वर क्लिक करण्यासाठी यूजर मोबाईल किंवा संगणकाचा आधार घेतात. याद्वारे युजरची माहिती फसवणुक करणाऱ्यांकडे संग्रहित केली जाते. या माहितीच्या आधारावर ऑनलाईन फसवणूक केली जाते. ओटीपी किंवा पिन-पासवर्ड अशा स्थितीत सामायिक करू नये.

हे सुद्धा वाचा

सायबर तज्ज्ञांच मत

अशाप्रकारच्या फसव्या योजनांसाठी माहिती एकत्रित केली जाऊ शकते. ज्याद्वारे सायबर गुन्हेगार थेट माहितीचा दुरुपयोग करू शकतात. त्यामुळे मोठ्या आर्थिक भुर्दंडाला देखील सामना करावा लागू शकतो असे मत सायबर तज्ज्ञांनी वर्तविलेलं आहे.

कसं कराल फॅक्ट चेक?

तुमच्याकडे अशाच स्वरुपाचे मेसेज येत असल्यास अशाप्रकारच्या मेसेजचे सत्य जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्हाला पीआयबीच्या माध्यमातून फॅक्ट चेकचा पर्याय उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत लिंक https://factcheck.pib.gov.in/ वर क्लिक करावे लागेल. यासोबतच तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल pibfactcheck@gmail.com यावर तथ्य शोधन करू शकतात.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.