AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आकड्यांचा गोलमाल की खरखुरं चित्र, जाणून घ्या बेरोजगारी दराविषयीचं नेमकं वास्तव

गेल्या पाच महिन्यांतील सर्वोच्च आकडा ठरला आहे. ऑगस्ट 2021 नंतर देशात हातांना काम नसणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत दिवसागणिक भर पडत गेली.

आकड्यांचा गोलमाल की खरखुरं चित्र, जाणून घ्या बेरोजगारी दराविषयीचं नेमकं वास्तव
आकड्यांचा गोलमाल की खरखुरं चित्र, जाणून घ्या बेरोजगारी दराविषयीचं नेमकं वास्तव
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 9:55 PM
Share

नवी दिल्ली : कोविड प्रकोपामुळे अर्थचक्राची गती मंदावली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अद्यापही उद्योगव्यवस्थेची घडी सुरळीत बसलेली नाही. तसेच स्थानिक बाजारपेठा कोविडच्या आर्थिक धक्क्यांतून सावरलेल्या नाहीत. दरम्यान, कोविडचा सर्वाधिक फटका रोजगार निर्मितीच्या क्षमतेवर बसला आहे. गेल्या महिन्यांत बेरोजगारीचा दर 7.9 टक्क्यांवर पोहोचला होता. तब्बल 5.3 कोटी नागरिक बेरोजगार (Unemployment Rate) असल्याचे आकडेवारीतून दिसून आले होते. गेल्या पाच महिन्यांतील सर्वोच्च आकडा ठरला आहे. ऑगस्ट 2021 नंतर देशात हातांना काम नसणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत दिवसागणिक भर पडत गेली. दरम्यान, बेरोजगारीच्या आकड्यातून वास्तव चित्रण समोर येत नाही. आकड्यांच्या पलीकडची बेरोजगारी समजावून घेण्यासाठी बेरोजगारीची व्याख्या ते आकडेवारी पद्धत समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

देशातील बेरोजगारीचं वास्तव चित्र समजून घेण्यासाठी रोजगार दर पडताळून पाहण्याची आवश्यकता आहे. देशातील नेमक्या किती हातांना रोजगार पूर्ण क्षमतेने उपलब्ध आहे.

बेरोजगार कुणाला म्हणावं?

केंद्र सरकारने बेरोजगारीची विशिष्ट स्वरुपाची व्याख्या निश्चित केली आहे. सरकारच्या विविध योजनांद्वारे बेरोजगार भत्ता अदा करण्याची तरतूद आहे. त्यानुसारच बेरोजगार व्यक्तीची व्याखा निश्चित करण्यात आली आहे. संघटित किंवा असंघटित क्षेत्रात गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत कोणतीही रोजगार संधी शोधणाऱ्या आणि रोजगार प्राप्त करण्यात अपयशी ठरलेल्या व्यक्तींचा समावेश बेरोजगार श्रेणीत केला जातो.

रोजगार किती जणांना?

CMIE च्या आकडेवारीनुसार, भारतात रोजगाराचा दर 38 टक्के आहे. देशातील रोजगारक्षम व्यक्तींचे प्रमाण 38 टक्के आहे. काम करण्याची क्षमता नसलेल्या (लहान मुले, ज्येष्ठ नागरिक इ.) यांचे प्रमाण 59 टक्के आहे. देशातील बेरोजगार व्यक्तींची टक्केवारी केवळ 3 टक्केच ठरते.

जगाचे आकडे बोलतात?

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, जगभरात रोजगार दरावर कोविडचा मोठा परिणाम झाला आहे. कोविड पूर्व काळात रोजगार दर 58 टक्के होता. मात्र, त्यात तीन टक्क्यांची घट दिसून आली आहे. भारताच्या सीमेलगतची राष्ट्रे चीनमध्ये 63 टक्के, बांग्लादेश 53 टक्के आणि पाकिस्तान 48 टक्के रोजगाराचा दर आहे.

बेरोजगारी एक समस्या

लोकसंख्येतील 0 ते 14 वयोगट व ज्येष्ठ नागरिक या व्यतिरिक्त घटकांचा कार्यकारी लोकसंख्येत समावेश होतो. बेरोजगारीमुळे देशातील मानव साधनसंपत्तीचा अपव्यय होतो. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. आवश्यक रोजगारक्षम कौशल्यांची उपलब्धता हा बेरोजगारी कमी करणाऱ्यावरील प्रमुख मार्ग मानला जातो.

इतर बातम्या

नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी रिलायन्स सज्ज

टीसीएसचा जागतिक ठसा, आयटीमधील जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी!

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.