5 लाख लोकांना रोजगार देण्याची रामदेव बाबांची घोषणा, काय आहे प्लॅन वाचा सविस्तर !

आरोग्याच्या बाबतीत स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं की, 137 टक्क्यांच्या वाढीसह 2 लाख 32 हजार कोटींचे बजेट जाहीर करण्यात आलं आहे.

5 लाख लोकांना रोजगार देण्याची रामदेव बाबांची घोषणा, काय आहे प्लॅन वाचा सविस्तर !
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 8:02 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं वर्णन करताना योगगुरू बाबा रामदेव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात पाम तेलाचे उत्पादन वाढताच पतंजली पाच लाख लोकांना रोजगार देईल अशी घोषणा बाबा रामदेव यांनी केली आहे. ते म्हणाले की, आरोग्याच्या बाबतीत स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं की, 137 टक्क्यांच्या वाढीसह 2 लाख 32 हजार कोटींचे बजेट जाहीर करण्यात आलं आहे. (union budget 2021 yogguru ramdev baba says will provide jobs to 5 lakh people in india)

पायाभूत सुविधांमुळे देशाची गती विकासाला मिळते. यंदाचं अर्थसंकल्प खेड्यातील आणि दुर्गम भागातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते जल जीवन अभियान असो किंवा शेतकऱ्यांसंबंधी बजेट असो सरकारने प्रत्येक दिशेने विचार केला आहे. हे बजेट सर्वसमावेशक आहे. सरकार जनतेसाठी नक्कीच काही पावलं उचलणार असल्याचंही यावेळी रामदेव बाबा म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सरकार स्वावलंबी भारत तयार करण्यासाठी पावलं उचलत आहे. आयात शुल्कापासून ते खाद्यतेलापर्यंत उत्पादन वाढवून लाखो लोकांना रोजगार मिळवून देण्याचं मोदी सरकारचं स्पप्न आहे. आजपर्यंत मी जवळपास पाच लाख लोकांना रोजगार दिला आहे. आणि येणार्‍या काळात इंडोनेशिया आणि मलेशियामधून होणाऱ्या व्यवसायामुळे आणखी नफा झाल्यास भारतातील उत्पादन वाढेल. त्यामुळे तेव्हा भारताला दोन लाख कोटी रुपयांची बचत होईल. इतकंच नाही तर पतंजलीच्या माध्यमातून स्वत: स्वामी रामदेव जवळपास पाच लाख लोकांना नोकरी देतील असं त्यांनी म्हटलं आहे.

या अर्थसंकल्पात प्रत्येकासाठी काहीतरी देण्यात आल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, देशात आयात शुल्क, उत्पादन आणि विविध खाद्यतेल व इतर वस्तूंचे उत्पादन वाढल्यास देश स्वावलंबी होईल. यामुळे मोदीजींचे देशात मॅन्युफॅक्चरिंग हब बांधण्याचं स्वप्न पूर्ण होईल, त्यामुळे अनेकांना त्यातून रोजगार मिळेल. (union budget 2021 yogguru ramdev baba says will provide jobs to 5 lakh people in india)

संबंधित बातम्या – 

‘या’ विशेष गवताची करा लागवड; कोट्यवधींची कमाई, अशी आहे संपूर्ण योजना

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं का? वाचा आजचे दर

सरकारकडे एक रुपया कसा जमा होतो, तो नेमका कुठे खर्च होतो? समजून घ्या बजेटचा ताळेबंद सोप्या शब्दात

(union budget 2021 yogguru ramdev baba says will provide jobs to 5 lakh people in india)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.