छप्परफाड कमाई; शेअर करा 4 जूनपूर्वीच खरेदी, असे का म्हणाले केंद्रीय गृहमंत्री?
Share Market Amit Shah : Lok Sabha Election 2024 निवडणुकीचा निकालाचा कल, बाजाराची अस्थिरता आणि महागाईचा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. 13 मे रोजी सकाळच्या सत्रातच बाजार क्रॅश झाला. बीएसई आकड्यानुसार, सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी 22,000 अंकांहून खाली आला.
शेअर बाजाराने गेल्या दोन आठवड्यात गुंतवणूकदारांना हादरवून सोडले आहे. बाजाराने त्यांना चांगलाच तडाखा दिला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी तर कहर झाला. बाजार सुरु होताच, अर्ध्या तासातच तो कोसळला. सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी 22,000 अंकांहून खाली आल्याने गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एक भविष्यवाणी याच दरम्यान चर्चेत आली आहे. काय केली आहे त्यांनी बाजारविषयीची भाकणूक?
लोकसभा घडामोडींशी संबंध नको
सोमवारी एका मीडिया चॅनलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुलाखत दिली. लोकसभा निवडणूक 2024 शी संबंधित घडामोडींचा शेअर बाजाराशी संबंध लावणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बाजारात तेजी येईल, असे संकेत, दावा त्यांनी केला. भारतीय शेअरधारकांना त्यांनी हा सल्ला दिला आहे.
अमित शाह यांचे संकेत काय?
आपण शेअर बाजाराच्या चालीचा अंदाज बांधू शकत नाही, असे शाह म्हणाले. पण केंद्रात स्थिर सरकार असेल तर बाजारात तेजी दिसते. मला भाजप-एनडीए 400 जागा मिळविण्याचा, एक Lok Sabha Election 2024, Share Market, Stock, Investment, Amit Shah शेअर बाजार, स्टॉक, गुंतवणूक, अमित शाहस्थिर मोदी सरकार येण्याची आणि त्यामुळे बाजारात तेजी येण्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी त्यांनी केलेल्या वक्तव्याने बाजारात चर्चेला उधाण आले आहे. बेंचमार्क निफ्टी गेल्या सात सत्रात, सहा सत्र घसरणीवर आहे.
सध्या बाजार अस्थिर
- लोकसभा निवडणुकीचा निकालाचा कल, बाजाराची अस्थिरता आणि महागाईचा शेअर बाजारावर परिणाम दिसून आला. 13 मे रोजी सकाळच्या सत्रातच बाजार कोसळला. बीएसई सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टी 22,000 अंकांहून खाली आल्याने गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले.
- टाटा मोटर्सशिवाय टाटा स्टील, मारुती, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. या घसरणीमुळे शेअर बाजारातील 17 कोटींहून अधिक गुंतवणूकदारांनी अर्ध्या तासातच 4.36 लाख कोटी रुपये गमावले. यापूर्वी पण गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने असेच तडाखे दिले.