स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्टार्टअप बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. स्टार्ट अपमध्ये सरकारचा जेवढा कमी हस्तक्षेप राहील, तेवढी ही योजना यशस्वी होऊ शकते, असे गोयल यांनी म्हटले आहे. सोबतच स्टार्ट अप योजनेमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांना जास्तीत जास्त प्रोहत्सान देण्याची सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले आहेत.

स्टार्ट अपला केंद्राकडून प्रोहत्साहन; घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 10:43 AM

नवी दिल्ली : केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्टार्टअप बाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. स्टार्ट अपमध्ये सरकारचा जेवढा कमी हस्तक्षेप राहील, तेवढी ही योजना यशस्वी होऊ शकते, असे गोयल यांनी म्हटले आहे. सोबतच स्टार्ट अप योजनेमध्ये हस्तक्षेप न करता, त्यांना जास्तीत जास्त प्रोहत्सान देण्याची सरकारची भूमिका असल्याचेही ते म्हणाले आहेत. ते सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. येणाऱ्या काळात स्टार्ट अपला लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा मिळून देण्यात येणार असल्याचेही गोयल म्हणाले आहेत.

स्टार्ट अपमध्ये भारत करतोय जगाचे नेतृत्व 

यावेळी बोलताना गोयल म्हणाले की, आजचे युग हे स्टार्ट अपचे आहे. स्टार्ट अपमध्ये भारत जगाचे नेतृत्व करत आहे. मात्र स्टार्ट अपमधून सुरू झालेलया व्यवसायात सरकारने हस्तक्षेप न करणे हेच त्या उद्योगाच्या हिताचे आहे. सरकारचा हस्तक्षेप नसल्याने संबंधित उद्योजकाला आपल्या वस्तुचे स्वरूप, किंमत आणि गुणवत्ता याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेता येतात, त्यातून उद्योगाची प्रगती होते. तसेच उद्योगाला सरकारने आधार न दिल्यास उद्योजक आपल्या स्वता:च्या हिमतीवर उभे राहातात. त्यामुळे स्टार्ट अपच्या कुठल्याही धोरणांमध्ये दखल न देण्याची भूमिका केंद्राकडून घेण्यात आली आहे.

70 पेक्षा अधिक स्टार्ट अपचा समावेश यूनिकॉर्न श्रेणीमध्ये

आज भारतातील तब्बल सत्तरपेक्षा अधिक स्टार्ट अपचा समावेश हा यूनिकॉर्न श्रेणीमध्ये झाला आहे. जागतिक स्तारावर ही संख्या सर्वाधिक आहे. जर या स्टार्ट अपने सरकारची मदत घेतली असती. तर कोरोना काळात सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फटका त्यांना बसला असता. केंद्राकडून महिलांना स्टार्ट अप सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत  आहे. हळूहळू  स्टाप्ट अप सुरू करणाऱ्या महिलांची संख्य वाढत असून, हे एक दिलासादायक चित्र आहे. यातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी  येत्या काळात स्टार्ट अपचा मोठा उपोयग होऊ शकतो.

संबंधित बातम्या 

Insurance | होम इन्शुरन्स पॉलिसीत मिळू शकते का पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई? जाणून घ्या काय आहेत नियम

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

या आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, दोन दिवसांच्या आत पूर्ण करा पैशांचे व्यवहार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.