‘बांधकाम उद्योगात ऑलेक्ट्राचा प्रवेश, नेक्स्ट – जनरेशन काँक्रीट स्टीलचे अनावरण : GFRP रीबार
'ऑलेक्ट्राचा बांधकाम उद्योगात निमित्ताने अधिकृत प्रवेश होत आहे. हे क्रांतिकारी उत्पादन लाँच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे असे ऑलेक्ट्राचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर के.व्ही. प्रदीप यांनी यावेळी सांगितले.

ऑलेक्ट्रा कंपनीने MEIL बजेट मिटींग दरम्यान आपल्या अत्याधुनिक GFRP रीबार ( ग्लास फायबर रिइंफोर्स्ड पॉलिमर रीबार ) लॉन्च केला आहे. हे इनोव्हेशन काँक्रीट रिन्फोर्समेंटच्या क्षेत्रात एक क्रांतीकारी बदल घेऊन आले आहे. ज्यामुळे एक मजबूत, टीकाऊ आणि स्थायित्व मिळणार आहे.
हॅण्डलींग आणि ट्रान्सपोर्टेशन सोपे होणार
ECR ग्लास आणि एपॉक्सी रेजिनने निर्मित ऑलेक्ट्राच्या या FRP रीबार पारंपारिक स्टील रिइन्फोर्समेंटच्या तुलनेत अनेक महत्वाचे फायदे आहेत. याची Ultimate Tensile Strength ही 950–1100 MPa पर्यंत आहे. त्यामुळे हे पारंपारिक स्टील पेक्षा दुप्पट मजबूत असून आणि कोणत्याही स्टीलच्या तुलनेत चार पट हलके असते. ज्यामुळे त्याचे हॅण्डलिंग आणि ट्रान्सपोर्टेशन करणे सहज सोपे होणार आहे.
GFRP रीबारचे वैशिष्ट्ये
‘बांधकाम उद्योगात ऑलेक्ट्राचा अधिकृत प्रवेश या निमित्ताने होत आहे. हे क्रांतिकारी उत्पादन लाँच करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. GFRP रीबारचे वैशिष्ट्ये खूपच चांगली आहेत. त्यामुळे याची देखभाल आणि खर्चात बचत होत आहे. त्यामुळे बांधकामांचे आयुष्य देखील वाढत आहे. या त्याच्या एप्लिकेशन रेंजमध्ये इंडस्ट्रीअल फ्लोअरिंग, पेव्हमेंट आणि ब्रिज डेक यांचा समावेश आहे. इको-फ्रेंडली आणि नॉन-कॉर्रोसिव ( गंज न लागणाऱ्या गुणांमुळे ) हे सागरी प्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे ऑलेक्ट्राचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर के.व्ही. प्रदीप यांनी यावेळी सांगितले.




ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड ( MEIL ग्रुप कंपनी )
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड कंपनी 2000 मध्ये स्थापन झाली होती. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड ( एक सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी ) ही MEIL ग्रुपचा एक भाग आहे. या कंपनीने साल 2015 भारतात इलेक्ट्रीक बससेची सुरुवात केली आहे. पॉवर ट्रान्समिशन सिस्टीम्स, सिलिकॉन रबर, कम्पोझिट इन्सुलेटर्स निर्मिती भारताच्या प्रमुख कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे.