…अन्यथा दोन दिवसांत तुमचं पॅन कार्ड होईल रद्द, आधी करा महत्त्वाचं काम

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पॅन आधारशी जोडलं नाही तर पॅन कार्ड धारकांना आयकर कायद्यानुसार दंड भरावा लागेल.

...अन्यथा दोन दिवसांत तुमचं पॅन कार्ड होईल रद्द, आधी करा महत्त्वाचं काम
पॅन-आधार लिंक करण्याची मुदत सरकारने 31 मार्च 2021 रोजी निश्चित केली. आतापर्यंत ज्यांनी पॅनला आधारशी जोडले नाहीये, त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यावे. पॅन कार्ड आधारशी जोडले नाही तर ते निष्क्रिय होते. निष्क्रिय पॅन वापरल्याबद्दल प्राप्तिकर कलम 272B अंतर्गत 10000 रुपये दंड आकारला आहे. प्राप्तिकर विभागाने यासाठी यापूर्वीच अधिसूचना जारी केलीय.
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:43 AM

मुंबई : आयकर भरणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) पॅन कार्डला (PAN) आधारशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 पर्यंत निश्चित केली आहे. असं केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड (PAN Card) उपयोगी राहणार नाही. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पॅन आधारशी जोडलं नाही तर पॅन कार्ड धारकांना आयकर कायद्यानुसार दंड भरावा लागेल. जर दंड टाळायचा असेल तर अंतिम मुदत संपण्यापूर्वी पॅनला आधारशी लिंक करा. (update your pan card in 2 days otherwise it will be canceled here is all process)

अधिक माहितीनुसार, 31 मार्चनंतर, ज्यांचे पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल. एकदा का जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. हल्ली इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्यासाठी, पॅन कार्जसह आधार क्रमांक देणंसुद्धा आवश्यक असणार आहे. याची शेवटची तारीख 30 जून 2020 होती, जी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने हे काम करून घ्या.

पॅनकार्ड होऊ शकतं बाद किंवा आकारला जाऊ शकतो दंड

पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.

पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

एसएमएसद्वारे पॅनला आधारशी लिंक कसे कराल?

जर आपण आयकर विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाईटद्वारे आपला पॅन आणि आधार लिंक करण्यास सक्षम नसल्यास आपण एसएमएसद्वारे आपल्या पॅनला आधार क्रमांकाशी लिंक करू शकता. यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवा. हे करण्यासाठी, आपल्या मोबाईलमध्ये UIDPAN (12 अंकी आधार क्रमांक) (10 अंकी पॅन) टाईप करा आणि ते 567678 किंवा 56161 वर पाठवावे. (update your pan card in 2 days otherwise it will be canceled here is all process)

संबंधित बातम्या – 

EPFO News : जुन्या कंपनीतून सोप्या पद्धतीने ट्रान्सफर करा PF, वाचा संपूर्ण प्रोसेस

Bank Holidays : एप्रिलमध्ये 15 दिवस बंद राहणार बँका, इथे वाचा संपूर्ण लिस्ट

फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Pulsar, Passion आणि Hero Karizma, वाचा काय आहे ऑफर

(update your pan card in 2 days otherwise it will be canceled here is all process)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.