UPI : ‘युपीआय’की डिजिटल वॉलेट?, जाणून घ्या ऑनलाईन पेमेंटसाठी कोणता पर्याय आहे अधिक सुरक्षित

युपीआय (UPI) पेमेंट सिस्टिम सुरू होण्यापूर्वी ऑनलाईन पेमेंटसाठी डिजिटल वॉलेट हा एकमेव पर्याय होता. पण UPI पेमेंटमुळे डिजिटल वॉलेटला एक मजबूत प्रतिस्पर्धी मिळालाय. मात्र अनेकदा या दोन्ही पेमेंट पर्यांपैकी कोणता पर्याय अधिक चांगला आणि फायदेशीर आहे असा प्रश्न आपल्याला पडतो.

UPI : 'युपीआय'की डिजिटल वॉलेट?, जाणून घ्या ऑनलाईन पेमेंटसाठी कोणता पर्याय आहे अधिक सुरक्षित
शुल्क लागणार का?Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 2:10 AM

युपीआय (UPI) पेमेंट सिस्टिम सुरू होण्यापूर्वी ऑनलाईन पेमेंटसाठी डिजिटल वॉलेट हा एकमेव पर्याय होता. पण UPI पेमेंटमुळे डिजिटल वॉलेटला एक मजबूत प्रतिस्पर्धी मिळालाय. मात्र अनेकदा या दोन्ही पेमेंट पर्यांपैकी कोणता पर्याय अधिक चांगला आणि फायदेशीर आहे असा प्रश्न आपल्याला पडतो. आज आपण दोन्ही पेमेंट सिस्टीममध्ये कोणता फरक आहे? तसेच कोणता पर्याय फायद्याचा आहे हे जाणून घेणार आहोत.युपीआय म्हणजे (Unified Payment Interface) ही एक इन्स्टंट रिअल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. या पेमेंट सिस्टीममधून एका बँकेतून दुसऱ्या बँकेत व्यवहार होतात. National Payments Corporation Of India म्हणजे (NPCI) ने UPI विकसित केलं आहे. याउलट डिजिटल वॉलेट बँक दोन खात्यांमधील मध्यस्थ आहे. डिजिटल वॉलेटला मोबाइल वॉलेट किंवा ई-वॉलेट देखील म्हणतात. या वॉलेटमार्फत पैसे दुसऱ्या ई-वॉलेट वापरकर्त्याच्या वॉलेटमध्ये पाठवू शकतो. अनेक फिनटेक कंपन्यांचे स्वत:चे ई-वॉलेट आहेत. अनेक बँकादेखील ई-वॉलेटच्या सुविधा देत आहेत. डिजिटल वाॉलेट सुरू करण्यासाठी बँकचं खात ई-वॉलेटला लिंक केल्यानंतर ई-वॉलेटमध्ये सहजपणे पैसे टाकता येतात.

युपीआय, डिजिटल वॉलेटमधील फरक

युपीआयमध्ये VPA म्हणजे Virtual Payment Address आणि ओळख वापरली जाते. तर डिजिटल वॉलेटमध्ये मोबाईल नंबरचा वापर करण्यात येतो. प्रत्येक व्यवहारासाठी युपीआयमध्ये 2 लाख रुपयांपर्यंत मर्यादा आहे. पण बँका त्यांच्या गरजेनुसार व्यवहाराच्या मर्यादा ठेवू शकतात. डिजिटल वॉलेटमध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपये भरता येतात. या व्यतिरिक्त ई-वॉलेटमधून मायक्रो एटीएम किंवा POS म्हणजे point of sale येथे 2000 रुपयांपर्यंत रोख रक्कम काढता येते.युपीआयचा व्यवहार दोन बँकांमध्ये होतो. सध्या 200 पेक्षा अधिक बँका UPI प्लॅटफॉर्मवर आहेत. तसेच डिजिटल वॉलेटचा वापर स्मार्टफोन , टॅब किंवा स्मार्टवॉचच्या माध्यमातून करता येतो. डिजिटल वॉलेटमधून पेमेंट करण्यासाठी पैसे पाठवणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या व्यक्तीकडे डिजिटल पेमेंट अॅप असणं गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

काय अधिक फायदेशीर?

युपीआयमधून तात्काळ पैसे पाठवता येतात. तर ई-वॉलेटमध्ये पैसे पाठवताना अनेक प्रक्रिया असतात. आधी बँक खात्यातून ई-वॉलेटमध्ये पैसे पाठवावे लागतात. त्यानंतर वॉलेटद्वारे बेनीफिशरी म्हणजे ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याला पैसै पाठवता येतात. युपीआयमध्ये इंटर ऑपेरिबिलिटीची सुविधा आहे म्हणजेच एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवता येतात. तसेच पैसै पाठवताना कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.तर दुसरीकडे डिजिटल वॉलेटमध्ये एकाच डिजिटल वॉलेटच्या दोन खात्यात व्यवहार करता येतो.युपीआयमध्ये अनेक रिपोर्ट आणि अलर्ट येतात. प्रत्येक व्यवहार केल्यानंतर वेगळी एंट्री होते त्यामुळे स्टेटमेंट लांबलचक दिसते. याउलट वॉलेटमुळे बँक स्टेटमेंटमध्ये केवळ एकच एंट्री दिसून येते. युपीआयच्या तुलनेत कॅशबॅक, व्हाऊचर्स आणि रिवॉर्डचे प्रमाण वॉलेटमध्ये जास्त आहे.या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर युपीआयचे फायदे अधिक दिसून येतात. मात्र वॉलेटमुळे देखील कोणतेही नुकसान न होता फायदाच होतो. ग्राहक आपल्या आवडीनुसार पेमेंट सिस्टीमची निवड करू शकतात.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.