यूएस फेडरल रिझर्व्हकडून अखेर व्याज दरात वाढ; महागाई नियंत्रणासाठी पाऊल
यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) 2018 नंतर प्रथमच व्याज दरात (Interest Rate) वाढ केली आहे. गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट होते, तसेच आता रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली : यूएस फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) 2018 नंतर प्रथमच व्याज दरात (Interest Rate) वाढ केली आहे. गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट होते, तसेच आता रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. महागाई (Inflation) नियंत्रीत करण्यासाठी तसेच अर्थव्यवस्थेतील सुधारणेसाठी यूएस फेडरल रिझेर्व्हरने व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. नव्या निर्णयानुसार बुधवारी व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्यास सामान्यत: व्याजदर वाढीमुळे देशांतर्गत चलन कमकुवत होते, तर रोखे उत्पन्नाला चालना मिळते. व्याजदर वाढीचा निर्णय शेअर बाजाराच्या पथ्यावर पडला असून, भारतीय शेअर बाजारात आज तेजीचे वातावरण आहे.
लोन महागनार
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचा निर्णय घेतला आहे. व्याजदरात 0.25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र याचा परिणाम जवळपास सर्वच क्षेत्रावर पहायला मिळणार आहे. व्याजदर वाढल्याने लोन महाग होण्याची शक्यता आहे. तसेच महागाई देखील कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आर्थिक मंदीचा अंदाज
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईच्या नियंत्रणासाठी व अर्थव्यवस्थेत सुधारणेसाठी व्याज दर वाढवण्यात आल्याचे मध्यवर्ती बँकेंच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. मात्र व्याज दरात केलेल्या वाढीमुळे महागाई आणखी वाढून, अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावू शकतो असा दावा अमेरिकन अर्थतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर, मात्र इंधन खरेदीत वाढ
गुंतवणूकदार मालामाल; 70 टक्के IPO मधून मिळाला चांगला परतावा
31 मार्चच्या आत पटापट पूर्ण करा बँकेशी संबंधित ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका