सेमीकंडक्टर समस्येचा अंत ‘वेदांत’ ! साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, अनिल अग्रवाल यांची मोठी घोषणा  

सेमीकंडक्टर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून 60 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. येत्या 3 वर्षात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यात येईल, अशी घोषणा अनिल अग्रवाल यांनी केलीय.

सेमीकंडक्टर समस्येचा अंत 'वेदांत' !  साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार, अनिल अग्रवाल यांची मोठी घोषणा  
Anil Agrawal
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 1:29 PM

नवी दिल्ली:  सध्या सेमीकंडक्टरच्या समस्येने अख्खे जग चिंताग्रस्त झाले आहे. अनेक मोठमोठे प्रकल्प सेमीकंडक्टर वेळेवर मिळत नसल्याने थंडावले आहेत.   हे असं कंपोनेंट आहे जे जगातील प्रत्येक कंपनी त्यांच्या उत्पादनात  वापर करते. या  समस्येकडे भारत सरकारने संधी म्हणून बघितले आहे आणि सेमीकंडक्टर च्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेत भारताला भविष्यातील सेमीकंडक्टर हब तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. वेदांत ग्रुपचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी सेमीकंडक्टर समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांची कंपनी येत्या तीन वर्षांमध्ये 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या भरीव गुंतवणुकीमुळे देशातील सेमीकंडक्टर उत्पादन वाढणार तर आहेत. त्याचा जागतिक बाजाराला सुद्धा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी वेदांता ग्रुपने दक्षिण कोरियाच्या एलजी कंपनी सोबत उत्पादनासाठी प्रयत्न केले होते. मात्र हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर आता वेदांत ग्रुपने दुसऱ्यांदा चीप आणि सेमीकंडक्टर उत्पादन करण्यासंबंधीच्या हालचाली सुरू केलेल्या असून त्यामध्ये भरीव व गुंतवणूक करण्याचा त्यांचा निर्णय त्यांना यश देईल असे वाटते.  2017 मध्ये वेदांत ग्रुपने जपानच्या AvanStrate या कंपनीचे अधिग्रहण केलेले आहे

60 हजार कोटींची भक्कम गुंतवणूक

वेदांत ग्रुपच्या या योजनेबाबत  AvanStrate चे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश हेब्बर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार हा प्रकल्प उभारण्यासाठी त्यांची विविध राज्यांशी चर्चा सुरू असून हा प्रकल्प टाकण्यासाठी अडीचशे ते चारशे एकर जागेची गरज आहे सेमीकंडक्टर उत्पादनासाठी वेदांता 45 ते 60 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक दोन टप्प्यात करण्यात येईल या गुंतवणुकीच्या यशानंतर पुढील गुंतवणुकीसंदर्भात आणि उत्पादनात संदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या मेहेरनजर ची गरज

सेमीकंडक्टर आणि चीप उत्पादनात संदर्भातील येऊ घातलेल्या प्रकल्पाबद्दल हेब्बरने सांगितलं की AvanStrate महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगाना, कर्नाटक या राज्य सरकारसोबत चर्चा करत आहेत. या प्रकल्पाविषयी सर्व राज्य सरकारसोबत गंभीरतेने चर्चा सुरू असून लवकरच त्यातून मार्ग निघेल असा  विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान केंद्र सरकारच्या सबसिडी व्यतिरिक्त राज्य सरकारांनी मदतनिधी द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. इतर बातम्या

Insurance Premium : विम्याचा हप्ता वर्षभरात दुसऱ्यांदा वाढणार, काय आहे तज्ज्ञांचं मत?

तुम्ही कधी स्टीम बाथ घेतला आहे का? मग घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या स्टीम बाथचे फायदे

Vedanta Group Planning to invest 60 thousand Crores in Semiconductor Crisis. Consider the World Shortage

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.