जुनी कार किंवा बाईक असेल तर जास्त पैसे खर्च करायला तयार राहा, वाचा काय आहे scrappage policy

जुन्या वाहनांना रस्त्यावरून काढून टाकण्यासाठी सरकारने 2021-22 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर केले होते.

जुनी कार किंवा बाईक असेल तर जास्त पैसे खर्च करायला तयार राहा, वाचा काय आहे scrappage policy
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 12:46 PM

Vehicle Scrapping Policy : जर तुम्ही दिल्ली-एनसीआरमध्ये रहात असाल आणि तुमच्याकडे जुनी कार असेल तर नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) ची वैधता तपासा. कारण 1 ऑक्टोबरपासून नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण (Vehicle Registraton fees) शुल्क महाग होईल. जुन्या वाहनांना रस्त्यावरून काढून टाकण्यासाठी सरकारने 2021-22 च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात वाहन स्क्रॅपिंग धोरण जाहीर केले होते. यात 20 वर्ष जुन्या खासगी वाहने व 15 वर्ष जुन्या व्यावसायिक वाहनांची तंदुरुस्ती चाचणी घेणे बंधनकारक आहे. आता रस्ते वाहतूक मंत्रालयाने (Road Transport Ministry) नवीन अधिसूचना जारी केली आहे. (vehicle scrappage policy by modi government rebate on new car)

RC नूतनीकरण, फिटनेस प्रमाणपत्र घेणं होईल महाग

सरकारने केंद्रीय मोटर वाहन (दुरुस्ती) नियम, 2021 जारी केले आहे. हे नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होतील. यामध्ये भंगार प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र व त्यांचे नोंदणी नूतनीकरण नियमांसह शुल्काबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यात नमूद केले आहे की जर वाहन नोंदणी रद्द करण्यासाठी प्रमाणपत्र घेतले गेले असेल तर अशा परिस्थितीत नवीन वाहन खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र घेता येणार नाही.

जर तुम्ही 1 ऑक्टोबरआधी स्क्रॅप प्रमाणपत्र घेतलं नसेल तर जुन्या कारवर तुम्हाला इंन्सेंटिव्ह मिळणार नाही. तसेच आरसीचे नूतनीकरण आणि फिटनेस प्रमाणपत्र घेणेही महाग होईल. हे सर्व खासगी वाहने आणि व्यावसायिक वाहनांना लागू असेल.

मोटरसायकल

नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 300 रुपये लागतील, तर नूतनीकरणासाठी 1000 रुपये द्यावे लागतील.

थ्री व्हीलर/Quadricycle

नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 600 रुपये लागतील, तर नूतनीकरणासाठी 2500 रुपये द्यावे लागतील.

हलकी मोटर वाहन (Light motor vehicle)

नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 600 रुपये लागतील, तर नूतनीकरणासाठी 5000 रुपये द्यावे लागतील.

इंपोर्टेड गाडी (Imported motor vehicle)

नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी 2500 रुपये लागतील, तर नूतनीकरणासाठी 10,000 रुपये द्यावे लागतील.

फिटनेस प्रमाणपत्राची चाचणी देखील महाग

1. मॅन्युअल मोटारसायकलसाठी 400 रुपये द्यावे लागतील, तर स्वयंचलित गाडीसाठी 500 रुपये शुल्क आकारले जाईल.

2. हे फी मॅन्युअल हलकी वाहने, तीन चाकी वाहनांसाठी 800 रुपये आहे. स्वयंचलित करण्यासाठी 1000 रुपये निश्चित केले गेले आहेत.

3. मध्यम वाहन / पॅसेंजर मोटर वाहन – मॅन्युअलसाठी 800 रुपये आणि स्वयंचलितसाठी 1300 रुपये

4. अवजड वाहन / पॅसेंजर मोटार वाहन – मॅन्युअलसाठी 1000 रुपये आणि स्वयंचलितसाठी 1500 रुपये

फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणही महाग

1. मोटारसायकलसाठी 1000 रुपये

2. तीन चाकी किंवा चार चाकीसाठी 3500 रुपये

3. हलक्या वाहनांसाठी 7500 रुपये

4. मध्यम वस्तू / प्रवासी मोटर वाहनासाठी 10,000

5. अवघड सामान / प्रवासी मोटार वाहनासाठी 12500 रुपये (vehicle scrappage policy by modi government rebate on new car)

संबंधित बातम्या – 

Bank of Baroda ची खास योजना, फक्त 1 रुपयामध्ये मिळणार थेट 2 लाखांचा विमा

Tata Sky ची धमाकेदार ऑफर! रिचार्जवर मिळतोय थेट 2 महिन्याचा कॅशबॅक

Gold-Silver Rate today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती वाढल्या, वाचा आजचे ताजे दर

31 मार्चपर्यंत ‘ही’ कामं काहीही करून पूर्ण करा, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

(vehicle scrappage policy by modi government rebate on new car)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.