‘या’ तीन बड्या कंपनींनी केली भागीदारी, प्रीपेड प्लॅनपासून ते स्मार्टफोनपर्यंत दिली धमाकेदार ऑफर
या कराराअंतर्गत स्मार्टफोनची किंमत आणि एकूण सहा महिने आणि एक वर्षाच्या बिलाच्या रकमेच्या आधारे ईएमआय मोजला जाणार आहे.
नवी दिल्ली : वोडाफोन आयाडिडया आणि बजाज फायनेन्सने भागिदारी केली आहे. ज्याअंतर्गत ईएमआयसोबत स्मार्टफोन आणि सहा महिन्यांचा आणि एक वर्षाचा प्रीपेड प्लान एकत्र दिला जात आहे. एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, या कराराअंतर्गत स्मार्टफोनची किंमत आणि एकूण सहा महिने आणि एक वर्षाच्या बिलाच्या रकमेच्या आधारे ईएमआय मोजला जाणार आहे. इतकंच नाही तर यानंतर संपूर्ण रक्कम सहा ते 12 मासिक हप्त्यांमध्ये विभागली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (vodafone idea bajaj is finance partner now offers on smartphones bundled with prepaid plans)
अधिक माहितीनुसार, जर ग्राहकांनी सहा महिन्यांसाठी व्हीआयएलची प्रीपेड योजना निवडली तर त्याला ईएमआयमध्ये 200 रुपये द्यावे लागतील, तर ओपन मार्केटमधून रिचार्ज केला तर ही रक्कम 249 रुपये होईल. अशा प्रकारे, एका वर्षाच्या रिचार्जवर, ग्राहकांना दर महिन्याला 2,399 रुपयांच्या योजनेसाठी 200 रुपये मोजावे लागतील. अशात ओपन मार्केटमध्ये रिचार्जसाठी आपल्याला 299 रुपये द्यावे लागतील.
या सगळ्या एकत्रित ऑफरसह जर व्हीआयएल ग्राहक 6 महिन्यांसाठी प्रीपेड रिचार्ज निवडतात तर त्यांना अमर्यादित व्हॉइस बेनिफिट्स मिळणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. यामध्ये सगळ्यात खास म्हणजे दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. त्याची किंमत 1197 रुपये आहे. दुसरीकडे, जर वापरकर्त्यांनी 12 महिन्यांचा रिचार्ज प्लॅन घेतला तर त्यांना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. जो अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह देण्यात आला आहे. त्याची किंमत 2399 रुपये आहे. खरेदी दरम्यान, तुम्हाला 100 मोफत एसएमएस आणि विनामूल्य राष्ट्रीय रोमिंग सुविधा मिळेल.
वोडाफोन आयडियाचे मुख्य विपणन अधिकारी अवनीश खोसला म्हणाले की, “कोव्हिडच्या संसर्गामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म मजबूत झाला आहे. यामुळे डिजिटल समाजात स्मार्टफोन आवश्यक आहे. स्मार्टफोनची सुविधा आणि टेन्शन फ्री रिचार्ज पॅक ग्राहकांना मिळवून देणं हे याचं लक्ष्य आहे. (vodafone idea bajaj is finance partner now offers on smartphones bundled with prepaid plans)
इतर बातम्या –
लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय
वृद्धापकाळात प्रत्येक महिन्याला मिळतील 30 हजार रुपये, ‘या’ बँकेत सोप्या पद्धतीने उघडा खातं
(vodafone idea bajaj is finance partner now offers on smartphones bundled with prepaid plans)