PPF नव्हे तर ‘हा’ आहे पैसे वेगाने दुप्पट करण्याचा सोप्पा मार्ग

VPF ही योजना EPFO मार्फत नोकरदारांसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. कर्मचारी आपल्या पगारातील कितीही रक्कम VPF मध्ये जमा करु शकतात. | VPF scheme

PPF नव्हे तर 'हा' आहे पैसे वेगाने दुप्पट करण्याचा सोप्पा मार्ग
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 10:54 AM

नवी दिल्ली: तुम्ही सध्या पैसे गुंतवण्यासाठी एखाद्या चांगल्या योजनेच्या शोधात असाल तर व्हॉलेंटरी प्रोव्हिडंट फंड (VPF) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेत PPF पेक्षा जास्त व्याज मिळते. तसेच VPF योजनेत PPF च्या तुलनेत दीड वर्ष आधीच तुमचे पैसे दुप्पट होतात. (How your money will be double in less time comapre to PPF)

व्हॉलेंटरी प्रोव्हिडंट फंडात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला वेगळे खाते खोलण्याची गरज नाही. याशिवाय, या योजनेतील व्याज हे सेक्शन 80C अंतर्गत करमुक्त असते.

VPF ही योजना EPFO मार्फत नोकरदारांसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. कर्मचारी आपल्या पगारातील कितीही रक्कम VPF मध्ये जमा करु शकतात. मात्र, ही रक्कम पीएफच्या 12 टक्क्यांपेक्षा अधिक असायला हवी. कर्मचाऱ्यांना वाटल्यास ते आपली संपूर्ण बेसिक सॅलरही VPF टाकू शकतात.

VPF योजनेचे फायदे?

* VPF खात्यावर पर EPF एवढेच व्याज मिळते. * नोकरी बदलल्यानंतर VPF फंड EPF प्रमाणे ट्रान्सफर करता येतो. * VPF मध्ये गुंतवणूक केल्यास सेक्शन 80C अंतर्गत करमाफी * EPF प्रमाणे VPF मधील गुंतवणूक EEE कॅटेगरीत येते. याचा अर्थ या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. * ऑनलाईन पैसे काढता येतात. * VPF खात्यामधून मध्येच रक्कम काढायची असल्यास खातेधारकाने पाच वर्ष नोकरी करणे गरजेचे आहे. अन्यथा कर आकारला जातो. * VPF ची रक्कम निवृत्तीनंतर मिळते.

PPF पेक्षा मिळते जास्त व्याज

VPF योजनेत PPF पेक्षा जास्त व्याज मिळते. सध्या PPF योजनेत 7.1 टक्के व्याज मिळते. तर VPF योजनेत पैसे गुंतवल्यास 8.50 टक्के इतके व्याज मिळते. तुम्ही या योजनेतील गुंतवणुकीची रक्कम कमी-जास्त करू शकता.

किती गुंतवणूक करू शकता?

PPF योजनेत तुम्ही एका वर्षात दीड लाखांची गुंतवणूक करु शकता. मात्र, VPFमध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

पैसे दुप्पट कधी होणार?

अर्थविश्वातील नियम 72 नुसार तुमचे पैसे किती दिवसांत दुप्पट होणार, याचे गणित ठरते. PPF योजनेत 7.1 टक्के व्याज मिळते. त्यामुळे नियमानुसार 72 ला 7.1 ने भागायचे. याचा अर्थ पीपीएफमध्ये 10.14 वर्षात पैसे दुप्पट होतात. तर VPF मध्ये व्याजदर 8.50 इतका असल्यामुळे 72 ला 8.5 ने भागले जाईल. त्यानुसार VPF मध्ये 8.47 वर्षात पैसे दुप्पट होतात.

संबंधित बातम्या:

करोडपती व्हायचंय, मुच्युअल फंडमध्ये योग्य गुंतवणूक करुन 20 वर्षांनंतर मिळवा परतावा

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय?, 1 जानेवारीपासून महत्त्वाचे 5 नियम बदलणार

(How your money will be double in less time comapre to PPF)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.