Wagh Bakari Tea | ‘वाघ बकरी’ कसे मिळाले नाव, पंचतंत्रातील गोष्टींशी असे आहे कनेक्शन

Wagh Bakari Tea | वाघ बकरी ही आज भारतातील तिसरी सर्वात मोठी चहा कंपनी आहे. जगातील 60 हून अधिक देशात चहाचा हा ब्रँड पोहचला आहे. पण वाघ बकरी हे नाव आज पण अनेकांसाठी आश्चर्यकारक आहेत. या ब्रँडचा लोगो पण अनेकांना अचंबित करतो. या ब्रँडचे पंचतंत्रच्या कथांशी काय आहे संबंध?

Wagh Bakari Tea | 'वाघ बकरी' कसे मिळाले नाव, पंचतंत्रातील गोष्टींशी असे आहे कनेक्शन
Follow us
| Updated on: Oct 24, 2023 | 6:35 PM

नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : ‘वाघ बकरी’ आज भारताची तिसरी सर्वात मोठा चहाचा ब्रँड आहे. देशातील 24 राज्य आणि जगातील 60 देशांमध्ये चहाचा हा ब्रँड पोहचला आहे. त्याची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात झाली आहे. पण वाघ बकरी या नावामुळे अनेकांना सूखद धक्का बसतो. वाघ आणि बकरी एकाच भांड्यातून चहा पित असल्याचे हे दृश्य अनेकांना अचंबित करणारे आहे. हा लोगो नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. या कंपनीचा लोगो अनेकांना आश्चर्याचा धक्का देतो. या कंपनीचे पंचतंत्रच्या गोष्टींसी काय कनेक्शन आहे? कधी स्थापन झाली ही कंपनी? कोणी स्थापन केली ही कंपनी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात..

कधी झाली सुरुवात

वाघ बकरी या ब्रँडची 1892 मध्ये सुरुवात झाली. या कंपनीचे संस्थापक नारणदास देसाई हे दक्षिण आफ्रिकेत नशीब आजमावण्यासाठी पोहचले. त्यांनी 500 एकरमधील चहाचे मळे खरेदी केले. तिथे चहा पत्तीचा व्यवसाय सुरु केला. याठिकाणी इंग्रज सतत भारतीयांचा आणि आफ्रिकन नागरिकांचा अपमान करत.

हे सुद्धा वाचा

महात्मा गांधी यांच्या संपर्कात

नारणदास देसाई यांना वंशवादाचे चटके सहन करावे लागले. त्याच दरम्यान ते महात्मा गांधी यांच्या संपर्कात आले. 1915 मध्ये इंग्रजांच्या त्रासामुळे त्यांना दक्षिण आफ्रिका सोडावे लागले. महात्मा गांधी यांनी त्यांची शिफारस केली. त्यामुळे गुजरातमध्ये त्यांना व्यवसाय करण्यास मदत झाली.

कसे पडले वाघ बकरी नाव

गुजरातमध्ये परत आल्यावर 1919 मध्ये त्यांनी अहमदाबादमध्ये गुजरात टी डेपो नावाने व्यवसाय सुरु केला. 1980 पर्यंत हा ब्रँड सुट्या चहाचीच विक्री करत होता. इतक्या दीर्घ काळात पॅकबंद, सीलबंद चहा विक्रीकडे हा समूह वळलाच नव्हता. त्यानंतर त्यांनी डबाबंद चहा बाजारात उतरवला.

या वाघ बकरी लोगोचा अर्थ काय

या लोगोत एका माणसाच्या हातात चहाचे भांडे आहे. तर या भांड्यात बकरी आणि वाघ हे दोन्ही प्राणी एकाच वेळी चहा पिताना दिसत आहेत. कंपनीनुसार हा लोगो सर्वसामान्य लोकांमधील सौहार्द दर्शवितो. वाघ हा उच्च वर्गाची खूण आहे तर बकरी ही गरीब लोकांची निशाणी आहे. गरीब-श्रीमंत लोक एकत्र येऊन चहा पित असल्याचे हा ब्रँड सुचवितो.

पंचतंत्र कथांशी कनेक्शन

‘वाघ बकरी’ लोगो भारतात लोकप्रिय पंचतंत्रच्या कथांपासून प्रेरित आहे. विष्णू शर्मा यांनी लिहिलेल्या नीतीशास्त्रावरील पुस्तक पंचतंत्र भारतीय जनमाणसात लोकप्रिय आहे. हे पुस्तक संस्कृत भाषेत असून ते 200 वर्षांपूर्वी लिहल्याचा संदर्भ मिळतो. पशू-पक्ष्यांच्या भूमिकेतून माणसाला यामध्ये जीवनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.