Insurance policy : तात्काळ कर्ज हवंय मग चिंता सोडा; विमा पॉलिसीवर मिळवा अधिक स्वस्त कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी कंपन्यांनी विशेष फॉर्म बनवले आहेत. हा फॉर्म तुम्हाला विमा कंपनीच्या जवळच्या शाखेत उपलब्ध होतो. तसेच हा फॉर्म कंपनीच्या वेबसाईटवरून देखील डाऊनलोड करता येतो.

Insurance policy : तात्काळ कर्ज हवंय मग चिंता सोडा; विमा पॉलिसीवर मिळवा अधिक स्वस्त कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 4:51 PM

व्यवसायाने मजूर असलेल्या बबनरावांची पत्नी आजारी आहे. उपचारासाठी (Treatment) बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार असल्यानं 1 लाख रुपये भरावे लागणार आहेत. परंतु पैशांची (money) सोय कशी होणार? यामुळे ते चिंतेत आहेत. त्याचवेळी एका विमा एजंटने विमा पॉलिसीवर (Insurance policy) कर्जाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती दिल्यानं त्यांची चिंता दूर झालीये. बऱ्याचदा अनेकजण पैशांची अचानक गरज पडल्यानंतर क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन घेतात. कर्ज मिळण्याची ही प्रक्रिया सोपी असल्याने हा व्यवसाय जोरात आहे. या कर्जावर वार्षिक 16 ते 48 टक्के एवढं मोठं व्याजदेखील भरावे लागते. तुमच्याकडे आयुर्विमा पॉलिसी असल्यास त्यावर कमी व्याज दरात कर्ज घेता येतं. आजकाल सर्वच विमा कंपन्या या सुविधा देत आहेत. हे कर्ज क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असते. या पॉलिसीवर कर्ज घेण्याची प्रक्रियादेखील अत्यंत सोपी आहे. तसेच विमा पॉलिसीवर कर्ज घेतल्याने तुमच्या विमा कव्हरही प्रभावित होत नाही.

कर्जासाठी अर्ज कसा करावा?

आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी कंपन्यांनी विशेष फॉर्म बनवले आहेत. हा फॉर्म तुम्हाला विमा कंपनीच्या जवळच्या शाखेत उपलब्ध होतो. तसेच हा फॉर्म कंपनीच्या वेबसाईटवरून देखील डाऊनलोड करता येतो. या फॉर्ममध्ये पॉलिसीची माहिती आणि कर्जाऊ रक्कमेबद्दल माहिती द्यावी लागते. फॉर्म पूर्ण भरल्यानंतर जवळच्या विमा कंपनीच्या शाखेत जमा करा. यासाठी तुम्ही विमा एजंटची मदत घेऊ शकता.काही कंपन्या ही सुविधा ऑनलाइन देतात.

कर्जाची रक्कम कशी निश्चित होते?

विमा कंपन्या पॉलिसीवर कर्जाची रक्कम सरेंडर व्हॅल्यूवर निश्चित करतात. परंपरागत विमा योजनांमध्ये सरेंडर व्हॅल्यूच्या 90 टक्के रक्कम ही कर्जाच्या रुपात मिळते. पॉलिसीच्या पेडअप स्थितीमध्ये कर्जाची मर्यादा 85 टक्क्यांपर्यंत असते. कंपनी यूलिपवर कर्ज देत असेल तर यामध्ये कर्जाची रक्कम त्याच्या फंड व्हॅल्यूवर अवलंबून असते. प्रत्येक विमा कंपन्यांचे कर्ज देण्यााठी वेगवेगळे नियम आहेत. मात्र, सर्वच कंपन्यां कर्जाची सुविधा देतात. मुदत विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्समध्ये मात्र कर्जाची सुविधा मिळत नाही.

हे सुद्धा वाचा

सुरक्षित कर्ज

पॉलिसीवर दिले जाणारे कर्ज हे सुरक्षित कर्ज असते. यामुळे विमा कंपन्या कर्ज देण्यात टाळाटाळ करत नाहीत. तसेच व्याजाचा दर देखील कमी असतो. सध्या अनेक विमा कंपन्या पॉलिसीवरील कर्जावर 9 ते 10 टक्के व्याज आकारत आहेत. अनेक कंपन्या या कर्जावर व्याजाची गणना सहा महिन्याच्या चक्रवाढीनुसार करतात. एकूणच विमा पॉलिसीवरील कर्ज बाजारातील उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांच्या तुलनेत स्वस्त आहे.आपत्कालीन परिस्थितिमध्ये पैशांची गरज पडल्यास आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज घेणे हा एक चांगला पर्याय आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.