Success Story : लहानपणी शेंगदाणे विकले, आज जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार

आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदाराबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी एकेकाळी वृत्तपत्रे विकले, कधी पॉपकॉर्न विकले तर कधी शेंगदाणे विकून आपली कमाई सुरू केली आणि आज त्यांनी 11 लाख कोटी रुपयांचे मोठे साम्राज्य निर्माण केले आहे. आज ते जगातील सहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Success Story : लहानपणी शेंगदाणे विकले, आज जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 9:24 PM

जगात अनेक अशी लोकं आहेत ज्यांनी संघर्ष करुन मोठं नाव कमावलं आहे. यश हे सहज मिळत नाही त्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागतात. या जगात मोठा झालेल्या व्यक्ती हा कधीच एका मोठ्या घरात जन्मलेला नव्हता. गरीबीचे दिवस पाहिले संघर्ष केला आणि मोठा झाला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्यांनी खुप वाईट दिवस पाहिले. शेंगा विकल्या आणि आज जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार बनले. आम्ही महान गुंतवणूकदार वॉरन बफेट यांच्या बद्दल बोलत आहोत. जे नंतर जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी गुंतवणूकदार बनले. बफेट यांचा प्रवास इतका प्रेरणादायी आहे की त्यांनी आपल्या शहाणपणाने आणि संयमाने शेअर बाजारात प्रचंड नफा कमावला. आज जगभरातील गुंतवणूकदार त्यांच्याकडून गुंतवणूक कशी करावी हे शिकतात.

वॉरन बफेट यांना गुंतवणुकीत रस होता. त्यांचे वडील हॉवर्ड बफे हे स्टॉक ब्रोकर होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना शेअर बाजाराची आवड होती. वॉरन बफेट यांनी वयाच्या 6 व्या वर्षी पैसे कमवायला सुरुवात केली. त्यांनी च्युइंगम, कोका-कोलाच्या बाटल्या आणि गोल्फ बॉल्स विकले. याशिवाय वृत्तपत्रे आणि पॉपकॉर्न विकूनही पैसा उभा केला. 1942 मध्ये, जेव्हा ते केवळ 11 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी $120 जमा केले (जे त्यावेळी सुमारे 120 रुपये होते) आणि त्यांची बहीण डोरिसने त्यांचे पहिले शेअर्स विकत घेतले. हे शेअर्स अमेरिकन पेट्रोलियम कंपनी सिटीज सर्व्हिसचे होते. पहिल्याच प्रयत्ना त्यांनी 5 डॉलर्सचा नफा कमावला, ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती आणि येथूनच त्यांचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू झाला.

वॉरन बफेट यांनी नेब्रास्का विद्यापीठातून पदवी प्राप्त केली, त्यानंतर ते हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये गेले पण त्यांना तेथे प्रवेश मिळाला नाही. यानंतर, त्यांनी मग कोलंबिया बिझनेस स्कूलच्या कॅटलॉगमध्ये बेंजामिन ग्रॅहम आणि डेव्हिड डॉड नावाच्या दोन प्राध्यापकांची नावे पाहिली, ज्यांचे पुस्तक त्यांनी आधी वाचले होते. बफेट यांनी या दोन्ही प्राध्यापकांना पत्र लिहून अभ्यासाची परवानगी मागितली. ग्रॅहम यांनी बफेट यांना गुंतवणुकीचे दोन महत्त्वाचे नियम शिकवले, जे बफेट आजही पाळतात. पहिला नियम होता – “पैसे कधीही गमावू नका” आणि दुसरा नियम होता – “पहिला नियम कधीही विसरू नका”. या नियमांचे पालन करूनच वॉरन बफेट यांनी आपला गुंतवणुकीचा प्रवास या उंचीवर नेला.

वॉरन बफेटची निव्वळ संपत्ती

वॉरन बफेट यांनी शेअर बाजारात छोटी मोठी गुंतवणूक करत सुमारे 11 लाख कोटी रुपयांची संपत्ती आज कमावली आहे. त्यांनी गुंतवणूक केलेल्या पोर्टफोलिओमध्ये 41 मोठ्या कंपन्यांचे सुमारे 24 लाख कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. यामध्ये ऍपल, कोका-कोला आणि बँक ऑफ अमेरिका सारख्या मोठ्या कंपन्या प्रमुख आहेत. ९४ वर्षाचे वॉरेन बफेट हे आज जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्तीचा एक मोठा भाग शेअर बाजारातून येतो, ज्यातून बाजारातील चक्रवाढीची शक्ती समजून घेण्याची आणि संयम राखण्याची त्याची कला दिसून येते.

वॉरन बफेट इतके मोठे होऊनही त्यांचे राहणीमान खूपच साधे होते. हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होते. त्यांच्याकडे आज फक्त एक घर आहे. जे त्यांनी 65 वर्षांपूर्वी ओमाहामध्ये $31,500 मध्ये विकत घेतले होते. आज या घराची किंमत 44 पटीने वाढून अंदाजे $14,39,000 (सुमारे 11.9 कोटी रुपये) झाली आहे. घर भाड्याने देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो, असे बफेट यांचे मत आहे. त्यांच्या मते मालमत्तेत गुंतवणुकीपेक्षा शेअर बाजारातील गुंतवणूक हा चांगला पर्याय असू शकतो. हे घर त्यांच्या पोर्टफोलिओमधील एकमेव रिअल इस्टेट आहे. बफेटचा यांचा असा विश्वास आहे की ते खर्च करण्यापेक्षा किती पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात हे त्यांच्या यशाचे गमक आहे.

वॉरन बफेट हे ‘मास्टर ऑफ कंपाउंडिंग’ म्हणून ओळखले जातात. त्यांना चक्रवाढीची ताकद समजली आणि त्यांनी त्याचा फायदा घेत शेअर बाजारात प्रचंड नफा कमावला. आज बाजारात गुंतवणूक करून त्यांनी आपल्या छोट्या गुंतवणुकीचे मोठ्या रकमेत रूपांतर केले. बफेट यांची ही क्षमता त्यांना जगातील इतर गुंतवणूकदारांपेक्षा वेगळी बनवते.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.