कसा आहे गौतम अदानी यांचा ‘आशियाना’, मुकेश अंबानी यांच्या अँटालिया सारखा आहे का आलिशान
Gautam Adani | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटिलाय हाऊसची चर्चा तर सर्व जगभर आहे. त्याविषयीच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या घराविषयी तुम्हाला माहिती आहे का? त्यांचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या शहरात आहे हे घर? हे घर आहे इतक्या कोटींचे..
नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : भारतच नाही तर जगातील सर्वात महागड्या घरात अँटालियाचा क्रमांक लागतो. त्याची जगभर चर्चा आहे. त्याविषयीच्या बातम्या पण तुम्ही वाचल्या असतील. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा अँटालिया हा आलिशान बंगला दक्षिण मुंबईत आहे. पण देशातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या घराचा पत्ता तुम्हाला माहिती आहे का? गौतम अदानी यांना हे वर्ष सर्वात त्रासदायक ठरले असले तरी, त्यांच्या उद्योगाचा पसारा मोठा आहे. देशातील कोणत्या शहरात त्यांचा हा आशियाना आहे, त्याची किंमत तरी किती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
कोणत्या शहरात आहे हा बंगला?
श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांचा हा आलिशान बंगला गुजरातमधील अहमदाबाद शहरात आहे. अदानी समूहाचे मुख्य कार्यालय गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आहे. तिथून थोड्या अंतरावर अहमदाबाद आहे. याच शहरात अदानी यांचे ‘Adani House’ आहे. गौतम अदानी यांनी काही वर्षांपूर्वी दिल्ली येथील लुटियन या परिसरात आलिशान बंगला खरेदी केला आहे. तर सफदरजंग एनक्लेव्हमध्ये अदानी समूहाचे एक गेस्ट हाऊस पण आहे.
कसे आहे Adani House?
गौतम अदानी यांचे अहमदाबाद येथील अदानी हाऊस हे नवरंगपूरा परिसरात आहे. मीठाखली सर्कल भागात हा बंगला आहे. अदानी यांचे घर शहरातील अत्यंत गजबजलेल्या परिसरात आहे. परंतु या बंगालाच्या परिसरात गेल्यावर हा भाग शांत असल्याचे जाणवते. या बंगल्या अत्यंत मोकळी जागा आहे. या ठिकाणी गौतम अदानी यांचे एक खासगी कार्यालय आहे. त्यांची पत्नी प्रिती अदानी आणि मुलांसह ते येथे राहतात.
दिल्लीत 400 कोटींचा बंगला
काही वर्षांपूर्वी गौतम अदानी यांनी दिल्लीतील लुटियन झोन या परिसरात एक बंगला खरेदी केला. तो 3.4 एकर परिसरात आहे. त्याचा बिल्टअप एरिया 25,000 चौरस फूट आहे. गौतम अदानी यांच्या अगोदर ही मालमत्ता आदित्य एस्टेट्सकडे होती. दिवाळखोरीनंतर NCLT च्या माध्यमातून अदानी यांनी हा बंगला 400 कोटी रुपयांनी खरेदी केला. या बंगल्याची किंमत 265 कोटी रुपये होती. तर 135 कोटी रुपये लीज होल्ड सोडवण्यास आणि फ्री होल्ड प्रॉपर्टीत बदलवण्यासाठी द्यावे लागले. हा बंगला सर्वोच्च न्यायालयाजवळ भगवान दास रोडवर आहे.