व्होडाफोन-आयडिया बंद झाल्यास 28 कोटी ग्राहकांचे काय?; ‘या’ 8 मोठ्या बँका होणार प्रभावित

सर्व प्रयत्न करूनही कंपनीच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत आहेत. अशा परिस्थितीत जर कंपनी बंद केली तर त्याचा परिणाम कंपनीच्या 28 कोटी ग्राहकांवर होणार आहे, त्याचबरोबर त्याचा परिणाम देशातील 8 मोठ्या बँकांवरही दिसून येईल.

व्होडाफोन-आयडिया बंद झाल्यास 28 कोटी ग्राहकांचे काय?; 'या' 8 मोठ्या बँका होणार प्रभावित
Vodafone-Idea
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 3:08 PM

नवी दिल्ली: भारताचे दूरसंचार क्षेत्र आजकाल चर्चेत आहे. विशेषतः वोडाफोन-आयडिया संदर्भातील बातम्यांकडे सगळ्यांचेच विशेष लक्ष असते. व्होडाफोन-आयडिया कंपनीचे वाढते नुकसान आणि नवीन गुंतवणूक बंद झाल्यामुळे कंपनीच्या अडचणी वाढत आहेत. विशेष म्हणजे कंपनीचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. सर्व प्रयत्न करूनही कंपनीच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत आहेत. अशा परिस्थितीत जर कंपनी बंद केली तर त्याचा परिणाम कंपनीच्या 28 कोटी ग्राहकांवर होणार आहे, त्याचबरोबर त्याचा परिणाम देशातील 8 मोठ्या बँकांवरही दिसून येईल.

देशातील 8 मोठ्या बँकाही प्रभावित होणार

व्होडाफोन आयडियाच्या अडचणी वाढल्याने एसबीआयसह देशातील 8 मोठ्या बँकाही प्रभावित होऊ शकतात. कंपनीवर 1.80 लाख कोटींचे कर्ज आहे, जे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे घेतले आहे. त्यात बँकांचा एक्सपोजर देखील समाविष्ट आहे. जर वोडाफोन आयडिया बंद झाली, तर या बँकांची मोठी रक्कम देखील डिफॉल्ट होऊ शकते.

28 कोटी ग्राहकही प्रभावित

जर व्होडाफोन आयडिया बंद झाली, तर त्याचा परिणाम देशातील मोठ्या मोबाईल ग्राहकांवरही दिसून येईल. व्होडाफोन आयडियाचे ग्राहक संख्या 28 कोटींच्या घरात आहेत. जर कंपनीच बंद झाली तर तर या ग्राहकांची संख्या बंद होणे स्वाभाविक आहे. विशेषतः Jio, Airtel यांसारख्या इतर कंपन्यांना याचा लाभ नक्कीच मिळू शकतो. कारण त्यांना या मोठ्या ग्राहक बेसचे भांडवल करायचे आहे.

बंदची चर्चा का?

व्होडाफोन-आयडिया कंपनीचे कर्ज वाढत आहे, त्याचबरोबर नवीन गुंतवणूक संपल्यामुळे अडचणी वाढल्यात. यामुळे व्होडाफोन-आयडियाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी कंपनीतील आपला हिस्सा सरकारला विकण्याची ऑफर दिली. पण सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला. बिर्ला यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कंपनी बंद होणार आहे की नाही, याचीच चर्चा होत आहे. मात्र, व्होडाफोन इंडियाच्या सीईओने आपल्या कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले आहे की, घाबरण्याची गरज नाही. प्रकरण सर्व नियंत्रणात आहे. पण आकडेवारी वेगळंच काही तरी सांगत आहे.

विलीनीकरणाने समस्या सुटली नाही

व्होडाफोन आयडिया गंभीर आर्थिक संकटातून जात आहेत. निधी गोळा करण्याचे त्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. बिर्ला यांनी नुकतीच कर्जबाजारी कंपनीला जामीन देण्यासाठी तत्काळ सरकारी पॅकेजची मागणी केली होती. व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर 31 ऑगस्ट 2018 रोजी विलीन झाले. तेव्हापासून ही कंपनी सतत तोट्यात आहे, तिच्यावर 1.80 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. आयडिया व्होडाफोनमध्ये विलीन झाली, जेणेकरून अडचणी कमी करता येतील. पण अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच राहिल्यात.

संबंधित बातम्या

‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले करोडपती, 10 हजारांचे वर्षभरात झाले 2.30 लाख

RBI Monetary Policy: GDP 9.5% वाढीचा अंदाज; पतधोरणातील मोठ्या गोष्टी जाणून घ्या, एका क्लिकवर सर्व माहिती

What about 28 crore customers if Vodafone-Idea shuts down ?; These 8 big banks will be affected

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.