क्रिप्टोकरन्सी व्हेल : मार्केटच्या किंमतीवर थेट परिणाम, वेळ स्ट्रॅटेजी बदलण्याची?

कोणतीही क्रिप्टोकरन्सी अधिक संख्येने बाळगणाऱ्यांना क्रिप्टो व्हेल म्हटलं जातं. सर्वाधिक संख्येने कॉईन त्यांच्याजवळ एकवटलेले असतात. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीवर मोठा परिणाम जाणवतो. त्यामुळे किंमतीत चढ-उतार नोंदविला जातो. मागील काही दिवसांपूर्वी बिटकॉईनच्या बाबतीत असंच चित्र पाहायला मिळालं.

क्रिप्टोकरन्सी व्हेल : मार्केटच्या किंमतीवर थेट परिणाम, वेळ स्ट्रॅटेजी बदलण्याची?
क्रिप्टोकरन्सी
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 8:43 PM

नवी दिल्ली : गुंतवणुकीचा (Investment) नवा मार्ग म्हणून क्रिप्टोकरन्सीचा (Cryptocurrency) मार्ग अजमाविणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अनुभवी गुंतवणुकदारांसोबत नव्या दमाची तरुणाई क्रिप्टोच्या अर्थजगताची भाग बनली आहे. गुंतवणुकीतील चढ-उताराच्या आलेखाचा क्रिप्टोही अपवाद नाही. तुमच्या खात्यात क्रिप्टोनं भरभराटही होईलं. अन् मार्केट (Market) गडगडल्यास तोट्याचे धनीही व्हावे लागेलं. क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

क्रिप्टोकरन्सी विषयी पुरेशी माहिती घेतल्याविना पैसे गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे ठरू शकते. तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम करणाऱ्या ‘क्रिप्टोकरन्सी व्हेल’ बद्दल तुम्हाला सारं काही माहित हवं.

क्रिप्टोकरन्सी व्हेल (Whale) म्हणजे काय?

कोणतीही क्रिप्टोकरन्सी अधिक संख्येने बाळगणाऱ्यांना क्रिप्टो व्हेल म्हटलं जातं. सर्वाधिक संख्येने कॉईन (Coin) त्यांच्याजवळ एकवटलेले असतात. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीवर मोठा परिणाम जाणवतो. त्यामुळे किंमतीत चढ-उतार नोंदविला जातो. मागील काही दिवसांपूर्वी बिटकॉईनच्या बाबतीत असंच चित्र पाहायला मिळालं.

क्रिप्टोच्या किंमतीवर व्हेलचा प्रभाव?

सर्वसाधारणपणे व्हेल शेअर्स (Shares) विक्रीची ऑर्डर देतात. मार्केटमधील अन्य सेल ऑर्डर पेक्षा कमी ठरतात. यामुळे मार्केटमध्ये चढ-उताराची परिस्थिती निर्माण होते. किंमतीत घसरण झाल्यानंतर मार्केटमध्ये अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होते.

क्रिप्टोची किंमत स्थिरता आणि व्हेलची विक्री ऑर्डर यांचं थेट समीकरण आहे. व्हेलने मार्केटमधील सर्वाधिक विक्री ऑर्डर मागे घेतल्यानंतर किंमतीत स्थिरता निर्माण होईल. व्हेलच्या गुंतवणूक धोरणांमुळे मार्केटच्या किंमतीत घसरतात. त्यामुळे कमी किंमतीत अधिकाधिक कॉईन्स खरेदी करणं क्रिप्टोना सहज शक्य ठरतं.

व्हेलद्वारे वापरली जाणारी दुसरी स्ट्रॅटेजी पहिल्यापेक्षा भिन्न आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सीच्या किंमती वाढविल्या जातात. यासाठी व्हेल मार्केटपेक्षा अधिक किंमतीने खरेदीच्या ऑर्डर देतात. त्यामुळे बोली लावणाऱ्या व्यक्तींना वाढीव किंमतीने ऑर्डर खरेदी कराव्या लागतात.

स्टॉक-मार्केट एक्स्चेंजच्या (Stock Market Exchange) नियमानुसार या स्ट्रॅटेजी बेकायदेशीर ठरतात. मात्र, क्रिप्टोच्या अर्थवर्तृळात अशा व्हेलचा सर्वाधिक बोलबाला आहे. त्यामुळे किंमतीवर चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकला जातो.

संबंधिक बातम्या –

Share Market Updates : शेअर मार्केटमध्ये घसरण, तीन दिवसांच्या तेजीला ब्रेक

EPFO : वाचवायचे असतील लाखो रुपये तर 31 डिसेंबरपूर्वी करा ‘ईपीएफओ’शी संबंधित ‘हे’ काम…

Insurance Premium : विम्याचा हप्ता वर्षभरात दुसऱ्यांदा वाढणार, काय आहे तज्ज्ञांचं मत?

कॅलेंडर उलटण्याआधी पूर्ण करायची चार महत्त्वाची कामं, नाहीतर नव्या वर्षात पडेल भुर्दंड

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.