Repo Rate : बरं काय असतो हा रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआर, तो का येतो आपल्या राशीला

Repo Rate : रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआरचा काय होतो परिणाम, थोडाशा बदलाचा कसा बसतो फटका, काय होते नुकसान, बदल न झाल्यास कसा मिळतो फायदा

Repo Rate : बरं काय असतो हा रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआर, तो का येतो आपल्या राशीला
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 11:19 AM

नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय बँकेने रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताच बदल न करण्याचा फैसला केला. देशाचा प्रमुख व्याजदर 6.50 टक्केच आहे. आरबीआय रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढ करेल असा अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यामुळे कर्जावरील व्याजदरात (Interest Rates on Loan) वाढ होण्याची शक्यता होती. परंतु, आरबीआयच्या निर्णयामुळे ग्राहकांनी, खातेदारांनी सुटकेचा निश्वास सोडला. रेपो दर, रिव्हर्स रेपो दर आणि सीआरआर हे शब्द तुमच्या सतत कानावर येतात. याविषयीच्या बातम्या आदळतात. पण याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचे उत्तर शोधुयात.

किती झाला बदल आरबीआयने दुसऱ्या धोरणात्मक दरांमध्ये पण कोणताही बदल केला नाही. यावेळी रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate) 3.35 टक्के आहे. तर कॅश रिझर्व्हर रेशो (CRR) 4.50 टक्के आहे. आरबीआयने रेपो दरात कुठलीच वाढ न केल्याने यावेळी बँकेच्या ईएमआयमध्ये कुठलीही वाढ होणार नाही. ग्राहकांना दिलासा मिळेल. जूनपर्यंत हा निर्णय कायम असले.

जूनमध्ये बदलाची शक्यता आरबीआयच्या रेपो दर धोरणात आता बदल झाला नसला तरी तो भविष्यात होऊ शकतो. जून महिन्यात पुन्हा आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक होईल. त्यावेळी महागाईचा तोरा अधिक असेल तर आरबीआय रेपो दरात वाढ करु शकते. त्यामुळे हा दिलासा सध्या तीन महिन्यांसाठीच आहे, हे लक्षात घ्या.

हे सुद्धा वाचा

काय असतो रेपो दर आरबीआय देशातील व्यावसायिक बँकांना कर्ज पुरवठा करतात, त्याला रेपो दर असे म्हणतात. रेपो दरात वाढ झाली की आरबीआय बँकांना महागडे कर्ज देते. बँका कर्जाचा बोजा ग्राहकांवर टाकते. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर व्याजदरात वाढ होते. आरबीआय महागाईत कर्ज कमी होण्यासाठी बाजारात लिक्विडिटी कमी करते. त्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात येते.

रिव्हर्स रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट या प्रकारात आरबीआय व्यावसायिक बँकांकडून कर्ज घेते. म्हणजे, या बँका आरबीआयकडे पैसे ठेव ठेवतात. त्यावर आरबीआय व्याज देते. रिव्हर्स रेपो दरात गेल्या काही दिवसांपासून काहीच बदल करण्यात आलेला नाही. सध्या हा दर 3.35 टक्के आहे.

कॅश रिझर्व्ह रेशो नगदी राखीव प्रमाण (CRR) हा बँकेतील जमा रक्कमेचा हिस्सा असतो. बँकांना आरबीआयकडे ही रक्कम ठेवणे बंधनकारक असते. 4 मे 2022 रोजी हा सीआरआरमध्ये वाढ करुन 4.50 टक्के करण्यात आला आहे. तेव्हापासून या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.