Investment in Share Market : शेअर बाजारातील गुंतवणुकीची आर्थिक साधने कोणती आहेत?

शेअर बाजार केवळ मर्यादित प्रमाणात परतावा देणाऱ्या शेअर्स सारख्या आर्थिक साधनांशीच संबंधित नाही.

Investment in Share Market : शेअर बाजारातील गुंतवणुकीची आर्थिक साधने कोणती आहेत?
शेअर बाजारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 7:24 PM

शेअर बाजारात गुंतवणुकदार (Investors) भांडवल निर्मिती करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक (Investment) करतात. काही गुंतवणुकदारांचा कल दीर्घकालीन गुंतवणुकीकडे असतो तर काही गुंतवणुकदार अल्प कालीन गुंतवणुकीला प्राधान्य देतात. सर्वसाधारणपणे केवळ शेअर्सच्या सहाय्यानेच शेअर बाजारा (Share Market)त गुंतवणूक केली जाऊ शकते असा समज आहे. परंतु केवळ यापुरतेच मर्यादित नाही. शेअर्स व्यतिरिक्त शेअर बाजारात गुंतवणुकीची साधने विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. खालील लेखांतून आपण सर्व आर्थिक साधनांविषयी जाणून घेणार आहोत.

शेअर्स

शेअर्स हे शेअर बाजारातील सर्वात लोकप्रिय आर्थिक साधन मानलं जातं. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता त्यावेळी प्रत्यक्षपणे कंपनीत अंशत: भागीदारी खरेदी करतात आणि कंपनीचे भागधारक बनतात. शेअर्स किंमतीत नेहमी चढ-उतार दिसून येतो. नफा-तोटा याच स्थितीवरुन ठरविला जातो.

डेरिव्हेटिव्हज

डेरिव्हेटिव्हज हा दोन पार्टीज (व्यक्ती किंवा आस्थापने) यामधील करार मानला जातो. डेरिव्हेटिव्हजमध्ये गुंतवणूकदार विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट दराने संपत्तीची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी करारबद्ध असतात. संपत्तीत शेअर्स, करन्सी, कमोडिटी इ. घटकांचा प्रकारांचा समावेश होतो. सोने किंवा तेलासाठी डेरिव्हेटिव्हज वापरले जातात. डेरिव्हेटिव्हजचे प्रमुख चार प्रकार आहेत – फ्यूचर्स (फ्यूचर्स ट्रेडिंग), ऑप्शन्स, फॉरवर्ड्स आणि स्वॅप्स. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग बद्दलच्या अधिक माहितीसाठी 5paisa.com https://bit.ly/3RreGqO भेट द्या. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी उपलब्ध असलेले विविध प्रॉडक्टची माहिती उपलब्ध असेल.

हे सुद्धा वाचा

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड हे इक्विटिज, मनी मार्केट, बाँड आणि विविध गुंतवणुकदारांच्या माध्यमातून पैसे उभारण करणाऱ्या आर्थिक साधनांत गुंतवणूक करतात. यामध्ये तुमच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन फंड मॅनेजर द्वारे केले जाते. गुंतवणुकदाराला अधिक परताव्याची प्राप्ती करून देणं हे फंड मॅनेजरचं उद्दिष्ट असतं. नव्या गुंतवणुकदारांसाठी आणि शेअर बाजाराचे मुलभूत ज्ञान असणाऱ्यांसाठी म्युच्युअल फंडचा पर्याय सर्वोत्तम ठरू शकतो.

बाँड्स

पैसे उभारणी करण्यासाठी सरकार किंवा कंपन्यां बाँड जारी करतात. तुम्ही बाँड खरेदी करण्याद्वारे जारीकर्त्याला एकप्रकारे कर्ज देतात. जारीकर्ता या कर्जासाठी तुम्हाला व्याज देतो. गुंतवणुकदाराला निश्चित व्याजदर प्रदान करत असल्यामुळे बाँड्स हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. निश्चित उत्पन्नाच्या हमीमुळे बाँड्सची गणना सुरक्षित निश्चित उत्पन्न साधनात केली जाते.

करन्सी

करन्सीची खरेदी आणि विक्री करन्सी मार्केटमध्ये केली जाते. उदा. फॉरेक्स मार्केट. करन्सी ट्रेडिंगमध्ये बँक, कंपन्या, मध्यवर्ती बँका (जसे की भारतातील RBI), गुंतवणूक व्यवस्थापन आस्थापने, ब्रोकर्स आणि सर्वसाधारण गुंतवणुकदार. करन्सी ट्रेडिंगमध्ये व्यवहार नेहमी दुहेरी असतो. उदा. USR/INR दर म्हणजे, एक US डॉलर खरेदी करण्यासाठी किती रुपयांची आवश्यकता असेल. तुम्ही BSE, NSE किंवा MCX-SX मार्फत करन्सीचे ट्रेडिंग करू शकतात.

कमोडिटी

कृषी साहित्य, उर्जा आणि धातू यांसारख्या दैनंदिन वस्तूंमधील ट्रेडिंगचा कमोडिटीत समावेश होतो. कमोडिटीमध्ये गुंतवणूक करण्याचा फ्यूचर काँट्रॅक्ट हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. विशिष्ट किंमतीला भविष्यातील विशिष्ट तारखेला कमोडिटींची खरेदी किंवा विक्री करणं काँट्रॅक्टच्या माध्यमातून शक्य ठरते. अनुभव नसलेल्या गुंतवणुकदारांसाठी कमोडिटीमधील गुंतवणूक जोखमीची ठरते. केवळ मल्टि कमोडिटी एक्स्चेंज, नॅशनल कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंज सारख्या अन्य एक्स्चेंजच्या माध्यमातून ट्रेडिंग केले जाऊ शकते.

Non Stop LIVE Update
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.