Petrol-Diesel Price Today : पेट्रोल – डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहे इंधनाची किंमत?
तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर केले असून आजही इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे. तर मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 106.35 रुपये आणि डिझेलसाठी 94.28 रुपये मोजावे लागतात.
मुंबई : तेल कंपन्यांनी सोमवार, 18 जुलै रोजी पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज इंधन दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेल नाही. गेल्या 58 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीत (Delhi) आज पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलीटर आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत (Mumbai)एक लिटर पेट्रोलसाठी 106. 35 रुपये मोजावे लागतील. तर कलकत्ता मध्ये पेट्रोल 106.03 आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये प्रति लिटर आहे. डिझेलच्या दरातही बदल झालेला नसून दिल्लीत एका लिटर डिझेलसाठी 89.62 रुपये तर मुंबईत 94.28 रुपये मोजावे लागतात. कलकत्ता येथे डिझेलचा दर 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये इतका आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. 21 मे रोजी पेट्रोवलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर मागे 8 रुपये तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात 6 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल 8.69 रुपयांनी तर डिझेल 7.05 रुपयांनी स्वस्त झाले होते.
काय आहेत तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर?
गेल्या 58 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तुमच्या शहरात इंधनाचे दर काय आहेत ते जाणून घ्या.
शहर पेट्रोल डिझेल ( रुपये प्रति लिटरप्रमाणे )
दिल्ली 96.72 89.62
मुंबई 106.35 94.28
कलकत्ता 106.03 92.76
चेन्नई 102.63 94.24
लखनऊ 96.57 89.76
जयपुर 108.48 93.72
भोपाळ 108.65 93.90
बंगळुरू 101.94 87.89
शिमला 97.30 83.22
पेट्रोलवर किती कर आकारला जातो ?
देशाची राजधानी दिल्लीत सध्या एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये आहे. त्यामध्ये बेस प्राइस (मूळ किंमत) 57.13 रुपये, भाडं 20 पैसे प्रति लिटर, उत्पादन शुल्क 19.90 आणि व्हॅट 15.71 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर डीलर कमिशन 3.78 रुपये प्रति लिटर आहे.
डिझेलवर किती कर आकारला जातो ?
दिल्लीत सध्या एका लिटर डिझेलसाठी 89.62 रुपये मोजावे लागतात. त्यासाठी बेस प्राइस (मूळ किंमत) 57.92 रुपये प्रति लिटर आहे. भाडं 0.22 पैसे, उत्पादन शुल्क 15.80 रुपये आणि व्हॅट 13.11 रुपये प्रति लिटर आहे. डीलर कमिशन 2.57 रुपये इतके आहे.