पेट्रोल, डिझेलवरील Excise Duty म्हणजे नेमकं काय?, ज्यातून सरकारची दररोज करोडोंची कमाई
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 110.04 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 98.42 रुपये प्रतिलिटर या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. पेट्रोल आणि डिझेलमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले. डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांची महागाईही गगनाला भिडली.
नवी दिल्लीः दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशाला मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं देशातील 130 कोटी जनतेला महागाईपासून दिलासा देत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केलीय. केंद्र सरकार देशभरात डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी आणि पेट्रोल 5 रुपयांनी कमी करणार असून, त्यामुळे डिझेलच्या दरात 10 रुपयांनी तर पेट्रोलच्या दरात 5 रुपयांनी कपात होणार आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर 4 नोव्हेंबरपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वोच्च पातळीवर
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 110.04 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 98.42 रुपये प्रतिलिटर या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. पेट्रोल आणि डिझेलमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले. डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांची महागाईही गगनाला भिडली. मात्र, पेट्रोलच्या किमतीवर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी अबकारी कर कमी केल्याने सर्वसामान्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळेल, मात्र पेट्रोलच्या दरात 5 रुपयांची घसरण झाल्यानंतरही ती कायम 100 रुपयांच्या वर राहणार आहे.
उत्पादन शुल्क (Excise Duty) म्हणजे नेमके काय?
उत्पादन शुल्क नावाने अबकारी करदेखील ओळखला जातो. हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे, जो एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर आकारला जातो. एखाद्या वस्तूचा निर्माता किंवा उत्पादक त्याच्या उत्पादनावर उत्पादन शुल्क वसूल करतो. विशेष म्हणजे तो ग्राहकांकडून वसूल केला जातो. उत्पादक त्याच्या उत्पादनावर आकारले जाणारे उत्पादन शुल्क त्या वस्तूवर लावलेल्या उर्वरित करात जोडून गोळा करतो. त्यानंतर तुमच्या उत्पादनावरील ग्राहकांकडून वसूल करण्यात आलेल्या उत्पादन शुल्काची रक्कम सरकारला सादर केली जाते. त्यामुळे शासनाला दररोज कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो.
भारतात उत्पादन शुल्काचा नियम कधी लागू झाला?
स्वातंत्र्यापूर्वीच 26 जानेवारी 1944 रोजी भारतात उत्पादन शुल्काचा नियम लागू करण्यात आला होता. उत्पादन शुल्क किंवा अबकारी कर हा एक कर आहे, जो केवळ उत्पादनाच्या विक्रीवर लावला जातो. याशिवाय विक्रीसाठी तयार केलेल्या उत्पादनावरही उत्पादन शुल्क आकारले जाते. उत्पादन शुल्काला आता केंद्रीय मूल्यवर्धित कर (CENVAT) असेही म्हणतात. कोणत्याही उत्पादनावर उत्पादन शुल्क लादण्याचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त महसूल गोळा करणे हा आहे, जेणेकरून त्याचा देशाच्या विकासासाठी वापर करता येईल.
संबंधित बातम्या
मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेल स्वस्त, मुंबईत आता किंमत काय?
खूशखबर! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू