सोन्याच्या दरात चढ-उतार, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती?
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे दर (Gold and Silver Price today) वाढल्याने त्याचे थेट परिणाम देशात बघायला मिळत आहेत.
मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे दर (Gold and Silver Price today) वाढल्याने त्याचे थेट परिणाम देशात बघायला मिळत आहेत. भारतात काल (17 नोव्हेंबर) 194 रुपयांनी सोने महाग झाले. मात्र, आज (18 डिसेंबर) MCX मध्ये सोने-चांदीचे भाव पुन्हा घसरले. MCX मध्ये सोन्याचे दर 0.26 टक्क्यांनी म्हणजेच 130 रुपयांनी घसरले. त्यामुळे सोन्याचा दर 50 हजार 260 प्रती दहा ग्रॅम असा झाला. याआधी गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजी होती. दररोज सोन्याचे दर वाढत होते. दरम्यान, चांदीचा दर 0.71 टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे चांदीचा दर हा 67 हजार 782 प्रती किलो असा आहे.
दिल्लीत गुरुवारी सोन्याचे दर 194 रुपयांनी वाढला होता. त्यामुळे गुरुवारी सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅम 49 हजार 455 रुपयांवर पहोचला होता. तर चांदीचा दर 1184 रुपयांनी वाढला होता. त्यामुळे चांदीचा दर प्रती किलो 66 हजार 969 रुपये इतका झाला होता. डॉलरची किंमत घसरल्याने आणि अमेरिकेत दुसरे प्रोत्साहन पॅकेज जाहीर होण्याबाबतच्या बातम्या समोर आल्यामुळे या आठवड्यात सोन्याचे दर वाढल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे (Gold and Silver Price today).
नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या खरेदीत वाढ
नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या किंमतीने उच्चांक गाठला असला तरी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात लोकांनी जास्त सोने खरेदी केले. विशेष म्हणजे ऑक्टोबरच्या तुलनेने 16 टक्के जास्त सोनेविक्री नोव्हेंबर महिन्यात झाली. दरम्यान, सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचं प्रमाण यावर्षी 70 टक्क्यांनी घटलं.
गुंतवणूक करण्याआधी रणनिती आखा
कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी ती संबंधित वस्तू कधी खरेदी करायची आणि विकायची हे योग्यवेळी ठरवणं जरुरीचं आहे. सोने खरेदी करताना ग्राहकांनी दैनंदिन घडामोडींवर लक्ष ठेवणं जरुरीचं आहे, अशी प्रतिक्रिया एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी दिली. त्याचबरोबर आगामी काळात नव्या कोरोना लस बाजारात आल्यानंतर सोन्याच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
संबंधित बातम्या :
GOLD RATE | सोनं जळगावपेक्षा पुण्यात जवळपास साडे चारशे रुपयांनी महाग
Gold Price | सोनं महागलं! पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव…