WITT 2024 : भारत तिसरी अर्थव्यवस्था बनणार, मोदी सच्चे देशभक्त; ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचे उद्गार

टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडेचं आयोजन केलं आहे. आज या कॉन्क्लेव्हचा दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी संवाद साधला. यावेळी टोनी अबॉट यांनी सच्चा देशभक्त म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला.

WITT 2024 : भारत तिसरी अर्थव्यवस्था बनणार, मोदी सच्चे देशभक्त; ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांचे उद्गार
Tony Abbott Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 10:40 AM

नवी दिल्ली ! 26 फेब्रुवारी 2024 : भारताकडे अद्भूत क्षमता आहे. त्यामुळेच येणाऱ्या काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी व्यक्त केला. भारत भलेही विकसनशील देश असेल. पण येथील 80 टक्के लोकसंख्येकडे चांगल्या सॅनिटेशनची व्यवस्था आहे. 90 टक्के लोकसंख्येला स्वच्छ पाणी मिळत आहे. 97 टक्के लोकसंख्येपर्यंत वीजही पोहोचली आहे. ही एक मोठी गोष्ट आहे, असंही टोनी अबॉट यांनी अधोरेखित केलं.

टीव्ही9 नेटवर्कने आयोजित केलेल्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांनी हा दावा केला. भारताची लोकशाही जर्मनी आणि स्पेन सारख्या देशांपेक्षाही जुनी आहे. क्वाडबाबत भारत आणि जपानचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, असं टोनी अबॉट म्हणाले. यावेळी त्यांनी चीन आणि रशियातील डाव्या विचारांच्या सरकारवर टीका केली. विस्तारवादी धोरण चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू राष्ट्रवादी म्हणतात. पण मोदी हे सच्चे देशभक्त आहेत, असंही ते म्हणाले.

आशिया-पॅसिफिक ते इंडो पॅसिफिकपर्यंत या विषयावर बोलताना त्यांनी हे मुद्दे मांडले. तसेच क्षेत्रीय संबंधांच्या मुळात काय आहे? ते कसे चांगले होतील? या विषयावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. स्वतंत्र विचारासोबत देशाचा विकास करणं शक्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पत्रकार ते पंतप्रधान

टोनी अबॉट हे ऑस्ट्रेलियाचे 28 वे पंतप्रधान होते. 2013 ते 2015 दरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून काम केलं आहे. त्यापूर्वी 2009 ते 2013पर्यंत टोनी हे विरोधी पक्षनेते होते. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. पण ते दोन वर्षाचे असतानाच त्यांचं कुटुंब ऑस्ट्रेलियाच्या सीडनीमध्ये आलं होतं. त्यांनी सीडनी यूनिव्हर्सिटीतून इकोनॉमिक्स आणि नंतर क्विन्स कॉलेज, ऑक्सफर्डमधून दर्शन आणि राजकारण या विषयाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. मॅनेजर आणि राजकीय सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

1994मध्ये टोनी पहिल्यांदा निवडून आले. राजकारणात दोन दशके सक्रिय राहिल्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले. टोनी अबॉट यांना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संबंधांना नव्याने परिभाषित करण्यासाठी ओळखलं जातं. टोनी अबॉट हे राजकारणातून निवृत्त झाले आहे. पण त्यांचं म्हणणं आजही जग ऐकत असतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.