Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today| काय आहेत सोन्याचे दर ? G7 देशांच्या बैठकीत रशियाच्या सोने निर्यातीवर बंदीचा फैसला

Gold Silver Price : सोने आणि चांदीचे भाव येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तर आजच्या भावात फार मोठी उलाढाल झालेली नाही.

Gold Silver Price Today| काय आहेत सोन्याचे दर ? G7 देशांच्या बैठकीत रशियाच्या सोने निर्यातीवर बंदीचा फैसला
आजचे सोने चांदी दरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 12:39 PM

Gold Silver Price Today: सोने आणि चांदीच्या भावात आज फारसा बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज जी7 देशांची (G7 Countries) महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत अमेरिकेसह जापान, ब्रिटन, कॅनडा सह इतर देश रशियातून (Russia) आयात होणा-या सोन्यावर निर्बंध (Ban on Gold Export) आणण्याचा निर्णय घेऊ शकतात. आज याविषयीची घोषणा होऊ शकते. त्यानंतर सोन्याच्या किंमतीवर (Gold Price) मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 47,650 रुपये आहे. गेल्या व्यापारी सत्रात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 47,550 रुपये होता. गुड रिटर्न्स या संकेतस्थळानुसार, चांदी (Silver Price) प्रति किलो 60,000 रुपयांनी विक्री होत आहे. प्रत्येक राज्यातील उत्पादन शुल्क, राज्य कर आणि इतर शुल्काचा विचार सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीत देशभर बदल होतो.गुड रिटर्न्स वेबसाईटवर राज्यासह देशातील प्रमुख शहरातील सोने चांदीच्या दराची माहिती देण्यात येते.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स संकेतस्थळानुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,650 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम 51,980 रुपये दर आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,680 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम 52,030 रुपये दर आहे. नागपूर शहरात आज 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 47,680 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम 52,030 रुपये भाव आहे. नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,680 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅम 52,030 रुपये दर आहे. प्रत्येक शहरात दागिन्याच्या किंमतीत फरक असतो.

हे सुद्धा वाचा

गोल्ड लोनचा फायदा

गोल्ड लोन च्या मदतीने भली मोठी रक्कम हाती येईल आणि अडलेले काम पूर्ण करता येईल. सिबिल स्कोअर खराब असो वा चांगले, त्यानंतर ही गोल्ड लोन घेतले असेल तर ही सिबिल स्कोअर सुधारण्याची सुवर्ण संधी आहे. वेळेत कर्जाच्या हप्त्यांची परतफेड केली, नियमीत हप्ते भरले तर क्रेडिट हिस्ट्री सुधारते आणि सिबिल स्कोअर ही सुधारतो. अनेक बँका ग्राहकांना 25,000 ते 25 लाख रुपयांचे सुवर्ण कर्ज देते. 6 ते 36 महिन्यांत हे कर्ज फेडावे लागते. गोल्ड लोनसाठी ज्या दिवशी बँकेकडे अर्ज कराल त्याच दिवशी खात्यात कर्ज रक्कम जमा होते.

अशी तपासा सोन्याची शुद्धता

सोन्याची शुद्धता तुम्हाला घरबसल्या तपासता येते. BIS Care App च्या माध्यमातून तुम्ही सोन्याचा शुद्धपणा तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक verify HUID द्वारे तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला सोन्यात भेसळ असल्याचे समजले अथवा सोन्याच्या व्यवहारात तुमची फसवणूक झाल्यास या अॅपवर तुम्हाला तक्रार ही दाखल करता येते. तक्रारीची दखल घेतल्यासंबंधीची माहिती ही अॅपद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

24 कॅरेट सोन्यावर 999 असे चिन्हांकित असते. 22 कॅरेट सोन्यावर 916 21 कॅरेट सोन्यावर 875 18 कॅरेट सोन्यावर 750 14 कॅरेट सोन्यावर 585 असे चिन्हांकित केलेले असते.

दिशा सालियन प्रकरणातील Exclusive बातमी, ...तेव्हा दिशाच्या अंगावर कपडे
दिशा सालियन प्रकरणातील Exclusive बातमी, ...तेव्हा दिशाच्या अंगावर कपडे.
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल
'कृपा करून...', अजितदादांनी संभाजी भिडे यांना सुनावले खडेबोल.
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?
रायगडावरील त्या समाधीसंदर्भात एक सवाल अन् उदयनराजे भडकले, कोण वाघ्या?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, 31 तारखेला मुंबईत थर्ड डिग्री?.
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?
वडिलांचं अफेअर अन्.., दिशाच्या मृत्यूचं कारण समोर; क्लोजर रिपोर्ट काय?.
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.