BHSeries – काय आहे भारत सिरीज; कोणाला होणार फायदा?, वाचा सविस्तर
गाडीचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये हस्तांतरण करायचे झाल्यास अनेक कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड असते. मात्र आता आपल्याला गाडीचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये सहज हस्तांतरण करता येणार आहे.
नवी दिल्ली : गाडीचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये हस्तांतरण करायचे झाल्यास अनेक कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड असते. मात्र आता आपल्याला गाडीचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये सहज हस्तांतरण करता येणार आहे. गाडी हस्तांतरण प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकच्या वतीने एक नवा राजिस्ट्रेशन मार्क भारत सिरीज (Bharat Series) सुरू करण्यात आला आहे. ज्याच्या बुकिंगला उत्तरप्रदेशच्या मिर्झापूरपासून सुरुवात झाली आहे. याचा महत्त्वाचा फायदा असा की, जर तुमच्याकडे बीएच सिरीजचे वाहन असेल तर तुम्हाला दुसच्या राज्यात वाहन हस्तांतरीत करताना पुन्हा नव्या नोंदणीची आवश्यकता नसते.
काय आहे बीएच सिरीज ?
आपण जर महाराष्ट्रात राहात असू तर आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटवर एमएच अर्थात महाराष्ट्राची सिरीज असते. जर एखाद्या व्यक्ती उत्तरप्रदेशमध्ये राहात असेल तर त्याच्या वाहनाच्या नंबर प्लेटवर त्याच्या राज्याची सिरीज असते. यामुळे एक तोटा असा होतो, की राज्य बदलताना आपल्याला प्रत्येकवेळी वाहनाची नव्याने नोंदणी कारवी लागते. मात्र हे सर्व टाळण्यासाठी आता परिवहन मंत्रालयाच्या वतीने नवी बीएच सिरीज सुरू करण्यात आली आहे. देशभरात एकच सिरीज असल्याने आपण कोणत्याही राज्यामध्ये गेलो तरी आपल्याला पुन्हा वाहनाची नोंदणी करण्याची गरज नाही. ही सिरीज घेण्यासाठी संबंधित मालकाने कमीत कमी दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असावा.
कोणाला होणार फायदा?
या ‘बीएच’ सिरीजचा सर्वाधिक फायदा हा केंद्रीय कर्मचारी तसेच राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच ज्या व्यक्तींची सातत्याने परराज्यात बदली होते, अशा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यासाठी देखील ही सिरीज महत्त्वपूर्ण आहे.
संबंधित बातम्या
इलेक्ट्रीक वाहन निर्मिती प्रोत्साहन; पेट्रोल,डिझेलच्या गाड्यांवर बंदी नाही, गडकरींचे स्पष्टीकरण
साखर उद्योगाला दिलासा; 303 मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीला परवानगी