SBI चे इंटरनेट बँकिंगसाठी दोन ॲप्स, दोघांमधील फरक काय? तुमच्यासाठी कोणते योग्य?
तुम्हीही एसबीआय बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे घरच्या घरी बँकेची अनेक महत्त्वपूर्ण कामे करू शकता. (difference between YONO SBI and YONO Lite Application)
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्टेट बँक ऑफ इंडिया सतत ऑनलाईन बँकिंगला प्रोत्साहन देत आहे. जर तुम्हीही एसबीआय बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही इंटरनेट बँकिंगद्वारे घरच्या घरी बँकेची अनेक महत्त्वपूर्ण कामे करू शकता. इतकंच नाही तर सद्यस्थितीत SBI चे अनेक ॲप्स इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्याद्वारे तुम्ही शॉपिंगपासून ते पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत सर्व कामे करु शकता. (What is the difference between YONO SBI and YONO Lite Application)
सध्या SBI चे दोन ॲप्लिकेशन उपलब्ध असून त्याचा उपयोग ऑनलाईन बँकिंगसाठी केला जाऊ शकतो. Yono SBI आणि YONO LITE SBI अशी या दोन ॲप्सची नावे आहे. या दोन्ही ॲपचे काम हे बँकिंग करणे हेच आहे. या दोन्ही ॲप्लिकेशन नेमका फरक काय? तुमच्यासाठी कोणते ॲप्स योग्य आहे? तुम्ही कोणते ॲप्स डाऊनलोड करायला हवेत? याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
?YONO LITE SBI Application नेमकं काय?
इतर बँकांच्या सामान्य बँकिंग ॲप्लिकेशनप्रमाणे हे ॲप आहे. याद्वारे तुम्हाला ऑनलाईन बँकिंग संबंधित काम करता येतात. जर तुम्हाला कोणालाही पैसे पाठवायचे असतील, अकाऊंट बॅलेन्स चेक करायचा असेल किंवा चेकबुकसाठी विनंती करायची असेल तर तुम्हाला याची माहिती मिळू शकते.
मात्र या ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती बदलू शकत नाही. जर तुम्हाला फोन नंबर किंवा पॅन कार्ड नंबर लिंक करण्याची सुविधा यात देण्यात आलेली नाही. यात तुम्हाला केवळ बँकेची काही साधी सोपी काम करता येतात.
?YONO SBI Application काय?
YONO SBI Application या ॲपचे वर्जन थोडे मोठे आहे. त्यामुळे ज्या बँकिंगच्या सुविधा YONO LITE SBI ॲपमध्ये मिळत नाही. ती सर्व बँकिंगची कामे तुम्हाला याद्वारे करता येतात. या ॲपद्वारेही तुम्ही शॉपिंग किंवा इतर कामं करु शकता. तसेच याद्वारे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहितीही बदलता येते. तसेच तुम्हाला येणारे बँकिंगचे अलर्ट तुम्ही याद्वारे चालू बंद करु शकता. तसेच इंटरनेट बँकिंगचा पासवर्डही तुम्हाला बदलता येतो.
?YONO SBI Application द्वारे कोणती बँकिंगची काम शक्य
?एटीएम कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढू शकता. ?मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चेंज करता येतो. ?पॅन कार्ड अपडेट करता येते. ?एसएमएस अलर्ट चालू किंवा बंद करता येते. ?एखादे एटीएम कार्ड ब्लॉक करू शकता. ?नवीन डिजीटल सेव्हिंग खाते उघडता येते. ?रिवॉर्ड्स पाईंट रिडीम करता येतात. ?इंटरनेट बँकेचा लॉगिन आयडी पासवर्ड बदलता येतो. ?व्यवहाराचे हक्क मॅनेज करता येतात. ?एखाद्या विशिष्ट वेबसाईटवर खरेदी करता येते.
?दोन्ही ॲपमध्ये होणारी बँकिंगची काम
SBI बँकेच्या दोन्ही ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता. तसेच अकाऊंटचे स्टेटमेंट डाऊनलोड करु शकता. त्याशिवाय FD किंवा RD अकाऊंट उघडता येते. तसेच ते बंदही करु शकता. तुम्हाला कोणत्याही बँक खात्यातून यात पैसे ट्रान्सफर करता येतात. तसेच चेक बुकसाठी अर्ज करता येतो. त्याशिवाय दोन्ही ॲपद्वारे डीटीएचचे रिचार्ज करता येतात. एखादे एटीएम कार्ड, क्रेडीट कार्ड तसेच बिल पेमेंट मॅनेज करता येते. (What is the difference between YONO SBI and YONO Lite Application)
संबंधित बातम्या :
रोख व्यवहारात कधीही करु नका ‘या’ 5 चुका, अन्यथा भरावा लागू शकतो इन्कम टॅक्स
SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 50 लाखांपर्यंत मिळणार विनामूल्य विमा, तुम्हाला फायदा काय?