RBI Gold : केंद्रीय बँकेची सुवर्ण ‘खेळी’! सोनं जमाविण्याचा सपाटाच लावलाय जणू, कारण तरी काय

RBI Gold : केंद्रीय रिझर्व्ह बँकेने सोने खरेदीचा सपाटाच लावला आहे. एका अहवालानुसार, कोरोना महामारीनंतर आरबीआयने सोन्याचा साठा वाढविला आहे.

RBI Gold : केंद्रीय बँकेची सुवर्ण 'खेळी'! सोनं जमाविण्याचा सपाटाच लावलाय जणू, कारण तरी काय
कारण तरी काय
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 6:24 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. एकीकडे केंद्र सरकार भारतीयांचं सुवर्ण प्रेम कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे आरबीआय मात्र सोन्याच्या साठ्यात सारखी वाढ करत आहे. कोरोना महामारीनंतर आरबीआयने सोने साठवणुकीचा फॉर्म्युला अंमलात आणला आहे. कोणत्याही वाईट परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक (Gold Investment) ही फायदेशीर ठरते. हजारो वर्षांपासून सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि परताव्याची हमी देणारी मानली जाते. केंद्रीय बँकेच्या या भूमिकेमागील कारणं काय आहेत, याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.

सोन्याचा साठा वाढला आरबीआय डेटाचा मनीकंट्रोलने विश्लेषण केले आहे. त्यानुसार, 20 मार्च 2020 पर्यंत सोन्याचा परकीय चलन साठा 6 टक्के होता, तो 24 मार्च 2023 पर्यंत 7.85 टक्क्यांवर पोहोचला. या 24 मार्च रोजी आरबीआयच्या तिजोरीत 3.75 लाख कोटी रुपयांचा सोन्याचा साठा आहे. यापूर्वी 20 मार्च 2020 रोजी आरबीआयकडे 2.09 लाख कोटी रुपयांचं सोनं होतं.

रिझर्व्ह बँकेने 2022 मध्ये एक रिपोर्ट जारी केला होता. त्यानुसार भारताकडे जवळपास 754 टन सोन्याचे भंडार आहे. गेल्या पाच वर्षात सर्वाधिक सोने खरेदी करण्यात आली आहे. सोने खरेदीचा केंद्रीय बँकेचा हा वेग पाहून तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसेल. बँकेने सोने खरेदीचा फास्ट ट्रॅक रेकॉर्ड तयार केला होता.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय बँकेने केवळ एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या दरम्यान 132.34 टन सोने खरेदी करुन टाकले. एकाच वर्षात इतकी सोने खरेदी करणारी आरबीआय ही जगातील एकमेव केंद्रीय बँक ठरली. 2021 मध्ये आरबीआय सोने खरेदीत तिसऱ्या क्रमांकावर होती. तर 2020 मध्ये बँकेने केवळ 41.68 टन सोने खरेदी केले होते.

इतके सोने देशात रिझर्व्ह बँक अधिकत्तम सोने हे बाहेरील देशात ठेवते. आरबीआयने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, भारताच्या एकूण सोने भंडारातील 296.48 टन सोने देशातच सुरक्षित ठेवण्यात आले आहे. तर 447.30 टन सोने परदेशी बँकांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. यामधील सर्वाधिक हिस्सा बँक ऑफ इंग्लंडकडे ठेवण्यात आला आहे. तर काही टन सोने हे स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षित आहे. येथील बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये (BIS) ही रक्कम सुरक्षित आहे.

जगभरात सोन्याचा एकूण साठ्यावर एक नजर टाकल्यास, सर्वाधिक सोने अमेरिकेकडे आहे. जगभरातील एकूण सोन्यापैकी जवळपास 75 टक्के साठा अमेरिकेकडे आहे. एका आकड्यानुसार, अमेरिकाकडे जवळपास 8,133 टन सोने आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी जर्मनी आहे. जर्मनीकडे 3,359 टन सोने आहे. चीन या यादीत सहाव्या स्थानी आहे. चीनकडे 1,948 टन सोने आहे. सोन्याचे भंडार असलेल्या टॉप-10 देशात आशियातील केवळ तीन देश आहेत.

या घडामोडींचा परिणाम जागतिक बाजारपेठेत सध्या अनिश्चिततेचे ढग आहे. युरोप आणि अमेरिकेतील बँकिंग सिस्टीमला ग्रहण लागले आहे. तर डॉलरचे पानिपत सुरु आहे. पश्चिमी देशातील महागाईचे आकडे भीती भरवणारे आहेत. गेल्या एकवर्षांहून अधिक सुरु असलेले रशिया-युक्रेन अनेक देशांसाठी संकट ठरले आहे. वित्तीय बाजारातील ही अनिश्चितता लक्षात घेऊन आरबीआयने सोन्याचा साठा वाढवला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.