Hindenburg Report : पुन्हा भूकंप! ही भारतीय महिला हिंडनबर्गच्या रडारवर, काय आहे 3 लाख कोटींचे कनेक्शन

Hindenburg Report : हिंडनबर्गने जगातील दिग्गजांना हेलावून सोडले आहे. भारतीय दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या नंतर त्याने जॅक डॉर्सीवर निशाणा साधला आहे. त्याची पेमेंट्स फर्म ब्लॉक इंक (Block Inc) हिचे व्यवस्थापन करणाऱ्या अनेक लोकांवर त्याने गंभीर आरोप लावले आहेत. आता एक भारतीय महिला नाथनच्या रडारवर आली आहे.

Hindenburg Report : पुन्हा भूकंप! ही भारतीय महिला हिंडनबर्गच्या रडारवर, काय आहे 3 लाख कोटींचे कनेक्शन
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 10:24 AM

नवी दिल्ली : अमेरिकेची शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्गने (Hindenburg) जगातील दिग्गजांना हेलावून सोडले आहे. भारतीय दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या नंतर त्याने जॅक डॉर्सीवर ( Jack Dorsey) निशाणा साधला आहे. त्याची पेमेंट्स फर्म ब्लॉक इंक (Block Inc) हिचे व्यवस्थापन करणाऱ्या अनेक लोकांवर त्याने गंभीर आरोप लावले आहेत. आता एक भारतीय महिला नाथनच्या रडारवर आली आहे. अदानी समूहाला तर हिंडनबर्ग वादळाचा जोरदार तडखा बसला. अजूनही या वादळातून हा समूह सावरला नाही. कर्ज चुकतं करण्यासाठी कंपन्यांतील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यात या रिपोर्टने अदानी समूह पुरता हादरवून सोडला आहे. आता हिंडनबर्ग अहवालात एका भारतीय महिलेचे नाव वारंवार येत आहे. तसेच तिच्याशी संबंधीत 3 लाख कोटींचे काय कनेक्शन आहे?

जॅक डॉर्सी याच्या पेमेंट्स फर्म ब्लॉक इंक (Block Inc) हिचे व्यवस्थापन करणाऱ्या अनेक लोकांवर हिंडनबर्ग अहवालात गंभीर आरोप लावण्यात आले आहे. यामध्ये एका भारतीय महिलेचे नाव वारंवार येत आहे. अमृता अहुजा असे या महिलेचे नाव आहे. तिने कंपनीचे शेअर डंप केल्याचा दावा करण्यात येत आहे. तिच्यावर शेअरची फेरफार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

कोण आहेत अमृता आहूजा?

हे सुद्धा वाचा

अमृता आहूजा अमेरिकेतील भारतीय वंशाच्या आहेत. त्या ब्लॉक इंकमध्ये मुख्य आर्थिक अधिकारी, CFO म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ड्यूक युनिव्हर्सिटीमधून आणि हॉर्वड बिझनेस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या 2019 मध्ये ब्लॉक इंक कंपनीत रुजू झाल्या. 2021 मध्ये जॅक डोर्सीने आहुजा यांना या कंपनीच्या आर्थिक प्रमुख म्हणून पदोन्नती दिली. तेव्हापासून या पदावर त्या कार्यरत आहेत.

अमृता आहूजा यांनी त्यांच्या करिअर सुरुवात मॉर्गन स्टेनलीमध्ये 2001 मध्ये, इन्वेस्टमेंट बँकर म्हणून केले होते. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या दाव्यानुसार, अमृता आहुजा या मूळ भारतीय वंशाचा आहे. त्यांचे आई-वडिल क्लीवलँडमध्ये एका डे-केअर सेंटरचे मालक होते. ब्लॉक इंकमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी Airbnb, McKinsey & Company, The Walt Disney Company मध्ये काम केलेले आहे. त्यांनी ‘कॉल ऑफ ड्यूटी, Candy Crush, World of Warcraft’ हे गेम्स पण तयार केले आहेत.

काय आहे 300 कोटींचे कनेक्शन

हिंडनबर्ग अहवालात, ब्लॉक इंकचे संस्थापक जॅक डॉर्सी आणि जेम्स मॅककेल्वे यांच्यासोबत अमृता आहुजा आणि त्यांची 300 कोटींची पेमेंट कंपनी ब्लॉक इंकचे लीड मॅनेजर ब्रायन ग्रासडोनिया यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार यांनी शेअर्समध्ये कोट्यवधी रुपये अडकवून ठेवले आहेत. या अहवालानुसार, इतर कोणाचा विचार न करता या सर्वांनी अगोदर स्वतःची आर्थिक तुंबडी भरली आहे.

अदानी समूहाला जोरदार झटका

यावर्षी 24 जानेवारी रोजी हिंडनबर्ग अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे अदानी समूहाला मोठा आर्थिक झटका बसला. गौतम अदानी यांच्या संपत्तीत 147 अब्ज डॉलरची घसरण झाली. गौतम अदानी यांची नेटवर्थ 127 अब्ज डॉलरवरुन घसरुन 40 अब्ज डॉलरवर आली. त्यांचे शेअर 85% टक्के घसरले. हिंडनबर्गच्या वादळातून हा समूह अजूनही सुटलेला नाही. हा समूह अजूनही गती पकडण्यासाठी झगडत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.