Petrol Rate Today | शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर

देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला  भिडलेले आहेत. शंभरीच्या आत-बाहेर खेळणा-या किंमतीमध्ये ग्राहकांना इंधनाची खरेदी करावी लागते. मग आज इंधनाचे बाजार भाव काय आहेत. तुमच्या शहरात पेट्रोल आणि  डिझेलचे भाव काय आहेत...याची माहिती तुम्हाला अगदी एका एसएमएसवर ही मिळू शकते.

Petrol Rate Today | शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 9:38 AM

मुंबई : आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव काय आहे. कसे ओळखाल कधी बदलल्या किंमती याविषयीची माहिती तुम्हाला ही एका एसएमएसवर कळेल. तर आज सरकारी तेल कंपनीने (IOCL) इंधन दर जाहीर केली आहे. पेट्रोल-डिझेलचे नवे दर घोषीत केले आहे. देशातील चार महानगरात आज दोन्ही इंधन दरामध्ये (fuel price)   फार काही बदल झाले नाहीत. दिवाळीनंतर इंधन दर स्थिर झाले आहेत. नवीन जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार, आज दिल्लीत पेट्रोलचे (Petrol) भाव 95.41 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल(Diesel) 86.67 रुपयांनी विक्री होत आहे.

मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव 

दिल्लीः पेट्रोल 95.41 रुपये तर डिझेल 86.67 रुपय प्रति लिटर

मुंबई ः पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर

चेन्नई ः पेट्रोल 101.40 रुपये तर डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता ः पेट्रोल 104.67 रुपये तर डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर

लखनऊ ः पेट्रोल 95.28 रुपये तर डिझेल 86.80 रुपये प्रति लिटर

गांधीनगर ः पेट्रोल 95.35 रुपये तर डिझेल 89.33 रुपये प्रति लिटर

पोर्ट ब्लेयर ः पेट्रोल 82.96 रुपये तर डिझेल 77.13 रुपये प्रति लिटर

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींना सकाळचा मुहुर्त

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये सकाळी 6 वाजता बदल होतो. सकाळी 6 वाजताच नवीन दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि अन्य कर जोडून इंधन किंमती दुप्पट होतात.

लवकरच इंधन होणार स्वस्त

लवकरच इंधन स्वस्त होणार आहे. सरकार पेट्रोल आणि  डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी नवीन योजना तयार करण्यात येत आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत कमी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. इतर अर्थव्यवस्थांशी याविषयीची बोलणी सुरु आहे. रणनीती ठरवत स्वस्त इंधन आयातीचा मार्ग अवलंबन्यात येत आहे.

मग आजचे भाव कसे ओळखणार

पेट्रोल-डिझेल चे बाजारभाव तुम्हाला रोजही मिळू शकतात. तेही एका एसएमएसवर (SMS) (How to check diesel petrol price daily),  इंडियन ऑईल कंपनीच्या ग्राहकांनी  इंधन दर समजण्यासाठी मोबाईलवर  RSP असा संदेश लिहून तो 9224992249 या मोबाईल क्रमांक पाठवावा. तर बीपीसीएल ग्राहकांनी इंधन दर जाणून घेण्यासाठी RSP असा संदेश लिहून तो 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. तर एचपीसीएल ग्राहकांनी HPPrice असा संदेश 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर त्यादिवशीच्या इंधन दराची माहिती मिळेल.

इथेनॉलवरील जीएसटीत मोठी कपात 

सर्वसामान्य नागरीक इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्याने मेटाकुटीस आला. त्याला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मध्यंतरी करामध्ये मोठी फेररचना करत किंमती अटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमातंर्गत इथेनॉलवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरुन थेट 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. EBP कार्यक्रमातंर्गत सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकते. या निर्णयामुळे पेट्रोलच्या किंमती पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्याः

एकाचवेळी निवडणूक घ्या, निवडणूक आयोगाला विचार करावाच लागेल: बाळासाहेब थोरात

Retirement Rights Day | चला, जाणून घेऊयात, निवृत्ती वेतनधारकांचे हक्क आणि अधिकार…!

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.