ETF मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया काय आहे?
एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) हे एखाद्या कंपनीच्या शेअर्सप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होतात. ETF खरेदी आणि विक्री कुठून करू शकता? आणि ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Demat Account असणे आवश्यक आहे का?
एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड असतात, जे स्टॉक मार्केटच्या इंडेक्स जसे की निफ्टी, सेंसेक्स किंवा बाजारातील वेगवेगळ्या थीम जसे PSU, बँकिंग किंवा IT स्टॉक्सच्या गटात, इंडेक्सच्या वेटेज (भार) नुसार गुंतवणूक करतात. ETF हे स्टॉक्सप्रमाणेच बाजारात ट्रेड करतात. त्यामुळे त्यात गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे. ETF खरेदी आणि विक्री प्रक्रिया स्टॉक ट्रेडिंगप्रमाणेच आहे.
जर तुम्ही ETF खरेदी करू इच्छिता, तर प्रथम एका ब्रोकरच्या मदतीने डीमॅट अकाउंट उघडा. नंतर या खात्याला ट्रेडिंग अकाउंटशी जोडून घ्या. ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाऊन ऑर्डर प्लेसमेंट ऑप्शन निवडा आणि आपल्या इच्छेप्रमाणे ETF निवडून ऑर्डर एंट्री फॉर्ममध्ये भरून द्या. यासोबतच, तुम्हाला किती ETF युनिट्समध्ये गुंतवणूक करायची आहे, तेही निश्चित करा. बाय बटणावर क्लिक करण्यापूर्वी, ETF चा iNAV (इंव्हेस्टमेंट नेट एसेट व्हॅल्यू) नक्की पाहा. iNAV तुम्हाला सांगते की ETF युनिट्स बाजारात योग्य किमतीवर ट्रेड करत आहेत की नाही. गुंतवणुकीची रक्कम भरल्यानंतर, ETF युनिट्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जमा होईल.
एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) हे एखाद्या कंपनीच्या शेअर्सप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होतात. ETF खरेदी आणि विक्री कुठून करू शकता? आणि ETF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Demat Account असणे आवश्यक आहे का? हे सर्व जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.#ETF #investment #ExchangeTradedFunds #Funds pic.twitter.com/4vCkkATpYm
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2024