Gram Suraksha Yojana | पोस्टाची योजनाच न्यारी, दररोज 50 रुपयांच्या बचतीत व्हा लखपती

Gram Suraksha Yojana News : ग्राम सुरक्षा योजनेत अवघ्या 50 रुपयांच्या बचतीत लखपती होता येते. 19 वर्षे ते 55 वर्षातील कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करु शकतो.

Gram Suraksha Yojana | पोस्टाची योजनाच न्यारी, दररोज 50 रुपयांच्या बचतीत व्हा लखपती
अवघ्या 50 रुपयात लखपतीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 6:04 PM

Post Office Gram Suraksha Yojana | भारतीय टपाल खात्याच्या (Post Office) गुंतवणुकीसाठी अनेक योजना (Investment Plan) आहेत. विशेष म्हणजे या सर्व योजना भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतातील एक मोठा वर्ग या योजनांवर डोळे झाकून विश्वास टाकतो. कारण या योजनांना सरकारचे संरक्षण (Government Security) मिळते. बँकांपेक्षा ही या योजनांमधील गुंतवणूक अधिक सुरक्षित असते. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना तर कमालीच्या लोकप्रिय आहेत. यामध्ये गुंतवणुकदारांना चांगला परतावा (Good Return) मिळतो. पोस्ट खात्याने ग्रामीण जीवन विम्यातंर्गत अनेक योजना बाजारात उतरवल्या आहेत. याच योजनेतील ग्राम सुरक्षा योजना ( Gram Suraksha Yojana News) आहे. ही योजना लोकप्रिय आहे. या योजनेत दररोज अवघे 50 रुपये गुंतवल्यास तुम्हाला 35 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो. या योजनेतील गुंतवणुकीविषयी आणि परताव्याविषयी जाणून घेऊयात.

कोण करु शकते गुंतवणूक

ग्राम सुरक्षा योजनेत 19 ते 55 वर्षे वयातील कोणताही व्यक्ती गुंतवणूक करु शकतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणुकीवर कमीतकमी 10,000 ते कमाल 10 लाखांपर्यंतची एकूण एकूण रक्कम मिळू शकते. या योजनेत गुंतवणुकीसाठी अनेक हप्त्यांचे पर्याय देण्यात आले आहे. गुंतवणूकदार मासिक, तिमाही, सहामाही अथवा वार्षिक आधारावर हप्त्याची निवड करु शकतो आणि त्याप्रमाणे या योजनेत गुंतवणूक करु शकतो. या योजनेविषयी अधिक माहिती हवी असेल तर पोस्ट कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व माहिती मिळू शकते. 1995 साली ग्रामीण टपाल जीवन विमा योजना सुरु करण्यात आली. ग्रामीण भागातील जनतेला डोळ्यासमोर ठेवत ही योजना सुरु करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

योजनेत मिळतो बोनस

या योजनेत गुंतवणूक केल्यास चार वर्षानंतर कर्ज सुविधा मिळते. जर एखाद्या पॉलिसीधारकाला ही स्कीम सरेंडर करायची असेल तर ती परत करता येते. योजना सुरु झाल्याच्या तीन वर्षानंतर ही सुविधा मिळते. या योजनेतंर्गत गुंतवणूकीच्या पाच वर्षानंतर बोनस मिळते.

किती रक्कमेचा परतावा

ग्राम सुरक्षा योजनेतंर्गत पात्र व्यक्तीला दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे दररोज केवळ 50 रुपयांची गुतंवणूक करावी लागते. कालावधी पूर्ण झाल्यावर त्याला 35 लाखांपर्यंत परतावा मिळू शकतो.

योजनेतंर्गत जर तुम्ही 19 वर्षाचे असताना 10 लाख रुपयांच्या ग्राम सुरक्षा योजनेत गुंतणूक करता, तर तुम्हाला वयाच्या 55 व्या वर्षी दर महिन्याला 1,515 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. तर 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411 रुपये दर महिन्याला जमा करावे लागतील.

गुंतवणूकदाराला वयाची 55 व्या वर्षी योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर 31,60,000 रुपये, 58 व्या वर्षी कालावधी पूर्ण झाल्यावर 33,40,000 रुपये आणि वयाची 60 वर्षे पूर्ण करणा-या व्यक्तीला 34.60 लाख रुपये मिळतील. ग्राम सुरक्षा योजनेतंर्गत व्यक्ती 80 वर्षांचा झाल्यावर ही रक्कम त्याला देण्यात येते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर उत्तराधिका-याला ही रक्कम देण्यात येते.

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...