Share बाजार सारखा आपटतोय! गुंतवणूक करण्याची हीच खरी सुवर्ण संधी? काय सांगतात तज्ज्ञ?
2022 च्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, चांदीमध्ये 10 टक्के आणि सोन्यात 8.3 टक्के वाढ झाली आहे. निफ्टी 7.8 टक्के आणि सेन्सेक्स 8.2 टक्क्यांनी घसरला आहे.
रशिया-युक्रेनमधील युध्दामुळे सोनं, चांदी, क्रुडसह शेअर बाजारातही चढउतार बघायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यापासून शेअर बाजाराचा निर्देशांक वेगाने खाली आलेले दिसून येत आहे. सध्या शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता (Instability) आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात बाजार घसरणीसह बंद झाला आहे. युक्रेन संकटामुळे, वस्तूंच्या किंमती, विशेषतः कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी उच्चांकावर आहेत. दुसरीकडे, महागाईचा ताण वाढत असल्याने यूएस फेडरल रिझर्व्ह (US Federal Reserve) या महिन्यात व्याजदर वाढवू शकते. एकूणच अनेक घटकांचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. शेतमाल बाजारातही मोठी तेजी आहे. महागाईचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. अशा वेळी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी (Investors) आता काय करावे? असा प्रश्न साहजिक निर्माण होत आहे.
बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सध्या निर्देशक नकारात्मक आहे. अशा स्थितीत व्यापार टाळावा. जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत ते ‘सरप्लस’ फंडातून दर्जेदार स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकतात. प्रत्येक पडझडीत थोड्या प्रमाणात खरेदी करावी. याशिवाय सोने आणि चांदीमध्येही गुंतवणूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महागाई वाढल्याने त्यांच्या किमती आणखी वाढतील.
2022 च्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार चांदी 10 टक्के, सोन्यामध्ये 8.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी 7.8 टक्के आणि सेन्सेक्स 8.2 टक्क्यांनी घसरला आहे. 10 वर्षांचे रोखे उत्पन्न 3 जानेवारी रोजी 6.5 टक्क्यांवरून 6.8 टक्क्यांवर पोहोचले आहे. 3 फेब्रुवारीला हे उत्पन्न 6.9 टक्क्यांवर पोहोचले होते. गुंतवणूकदाराला बाजारातून अल्पावधीत पैसे कमवायचे असतील तेव्हा समस्या निर्माण होते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. बाजार पडल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. यामुळे तो बाजारातून बाहेर पडून एक्झिट घेत असतो. बहुतेक गुंतवणूकदार तेच करतात, ज्यामुळे बाजारातील अस्थिरता आणखी वाढते. गुंतवणूकदारांनी बाजारात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली पाहिजे.
बाजारात हळूहळू पैसे गुंतवा
तुमच्याकडे असलेल्या सरप्लस फंडाच्या 30-40 टक्क्यांपर्यंत बाजारात गुंतवणूक करा आणि उरलेली रक्कम लिक्विड फंडात जमा करा. पुढील चार-सहा महिन्यांत हा निधी वापरा आणि सरासरी किंमत कमी करण्यासाठी बाजारात खाली येउ लागला की गुंतवणूक करा. बाँडबाबत असे सांगितले जात आहे की पुढील 9-12 महिन्यांत, बाँडचे उत्पन्न पुन्हा कमी होईल. त्यामुळे रोख्यांमध्ये अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करा.
सोन्याऐवजी चांदीमध्ये गुंतवणूक
मोतीलाल ओसवालच्या कमोडिटी रिसर्च अॅनालिस्ट नवनीत दमानी म्हणाल्या, की जर तुम्हाला महागड्या धातूंमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सोन्याऐवजी चांदीमध्ये गुंतवणूक करा. ते म्हणाले की, वाढत्या रशिया-युक्रेन वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडत आहेत. सध्या कच्चे तेल 11 वर्षांच्या उच्चांकावर आहे. त्यामुळे महागाई आणखी वाढेल. सर्व घटकांमुळे महागड्या धातूंच्या किमतीत आणखी वाढ होणार आहे.
संबंधित बातम्या :
नव्या कारसाठी तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार? रशिया-यूक्रेन युद्धामुळे चिपची कमतरता