मारुती सुझुकी ते टाटा मोटर्सपर्यंत ऑटो कंपन्यांना बजेटमधून काय हवं? जाणून घ्या
मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सने अर्थसंकल्प 2025 पूर्वी सांगितले आहे की, अर्थसंकल्पाकडून वाहन क्षेत्राला काय अपेक्षा आहेत? अर्थसंकल्प सादर होण्यास फारच कमी वेळ आहे, यंदाचा अर्थसंकल्प खरोखरच वाहन उद्योगाची 'आशा' पूर्ण करतो की नाही हे येणारा काळच सांगेल. पण, नेमक्या अपेक्षा काय आहेत, जाणून घेऊया.

अर्थसंकल्प 2025 सादर होण्यास फारच कमी वेळ बाकी आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राला काही अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्ससारख्या बड्या ऑटो कंपन्यांना ऑटो सेक्टरची मंदावलेली वाढ वाढवण्यासाठी अर्थसंकल्पातून काय हवे आहे? जाणून घेऊया.
मारुती सुझुकी इंडियाने म्हटले आहे की, अर्थसंकल्प 2025 मध्ये उपभोगाचा वेग सुधारण्यासाठी कोणतेही उपाय केल्यास मंदावलेल्या वाहन उद्योगाचा वेग वाढण्यास मदत होऊ शकते.
मारुती सुझुकीचे काय म्हणणे आहे?
मारुती सुझुकीचे म्हणणे आहे की, 2025 च्या शेवटच्या तीन तिमाहींचा विचार केल्यानंतर आता चौथ्या तिमाहीत किरकोळ विक्रीत 3.5 टक्क्यांनी वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे. मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट अफेअर्स) राहुल भारती म्हणाले की, मला वाटते की वाहन क्षेत्राशी संबंधित बहुतेक गोष्टी जीएसटीच्या कक्षेत आहेत.
खप वाढवण्याच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलले तर ते वाहन उद्योगासाठी खूप चांगले ठरेल. राहुल भारती म्हणाले की, जे भारतासाठी चांगले आहे ते मारुतीसाठी चांगले आहे. अर्थव्यवस्था चांगली चालली आणि खपही वाढला तर ते आपल्यासाठी चांगलं ठरेल.
टाटा मोटर्सला अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा?
टाटा मोटर्स समूहाचे सीएफओ पीबी बालाजी म्हणाले की, सरकारने अर्थसंकल्पात मागणी वाढविण्यासाठी पावले उचलली तर देशांतर्गत वाढीलाही चालना मिळू शकते. पी. बी. बालाजी म्हणाले की, सणासुदीच्या हंगामानंतर कडक रोकड स्थितीसह अनेक कारणांमुळे मागणी मंदावली आहे. पीबी बालाजी म्हणाले की, मजबूत मागणी आणि सरकारने पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे चौथ्या तिमाहीत मागणी सुधारण्याची अपेक्षा आहे.
देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात सरकार मोठ्या घोषणा करते, ज्या सर्व क्षेत्रांशी संबंधित असतात. 2025 चा अर्थसंकल्प मध्यमवर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.