WhatsApps Furute Update : व्हाट्सअॅपचा व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठीचा नवा Interface

व्हाट्सअॅप (WhatsApp) आपल्या व्हॉइस कॉल(voice and video call)साठी एक नवीन इंटरफेस (Interface)विकसित करतोय. इंटरफेस इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या Android आणि iOS दोन्ही व्हर्जनला तो लागू असेल.

WhatsApps Furute Update : व्हाट्सअॅपचा व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठीचा नवा Interface
WhatsApp
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 3:09 PM

मुंबई : व्हाट्सअॅप (WhatsApp) आपल्या व्हॉइस कॉल(voice and video call)साठी एक नवीन इंटरफेस (Interface)विकसित करतोय. इंटरफेस इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या Android आणि iOS दोन्ही व्हर्जनला तो लागू असेल. या नवीन इंटरफेसद्वारे पर्सनल आणि ग्रुप व्हॉइस कॉलसाठी अधिक चांगला अनुभव आणण्याचा WhatsAppचा उद्देश आहे. WABetainfoच्या रिपोर्टनुसार, व्हाट्सअॅप आता व्हॉइस कॉल करणार्‍या यूझर्ससाठी एक नवीन इंटरफेस देण्यावर काम करत आहे. दरम्यान, व्हाट्सअॅप बीटा टेस्टर्ससाठी हा पर्याय अद्याप उपलब्ध नाही.

जास्त अॅडव्हान्स आम्ही आपल्याला एक स्क्रीनशॉट दाखवतो आहोत. यात आपण पाहू शकता, की WhatsApp पुढच्या अपडेट्ससाठी इंटरफेसला अधिक कॉम्पॅक्ट आणि प्रगत करण्यासाठी आणि त्याची रचना सुधारण्यासाठी पुन्हा डिझाइन करतोय. नवीन रीडिझाइन केलेला फॉर्म विशेषतः ग्रुप व्हॉइस कॉल करताना चांगला दिसेल. कार्यक्षमतेच्या बाबतीत, कॉल स्क्रीन अजिबात बदलत नाही, सर्व बटणं आणि इंटरफेस त्याठिकाणीच राहतात. हा स्क्रीनशॉट iOSसाठी WhatsAppवर घेण्यात आला होता. नवीन इंटरफेस जास्त कॉम्पॅक्ट आणि अॅडव्हान्स दिसतोय.

व्हाट्सअॅपवर नवीन इंडिकेटर दिसेल रिपोर्टनुसार, मेटा-मालकीचं प्लॅटफॉर्म व्हाट्सअॅप असं इंडिकेटर जोडण्याची योजना करतंय, जे यूझर्सना सांगतील, की या प्लॅटफॉर्मवरून केलेले सर्व कॉल एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहेत. “तुमचे पर्सनल कॉल एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहेत” असा मेसेज म्हणून हे इंडिकेटर दिसेल. केलेल्या व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी हा मेसेज अॅपच्या कॉल्स टॅबमध्ये केलेल्या किंवा रिसिव्ह केलेल्या कॉलच्या खाली दिसेल.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन केलं होतं लॉन्च WhatsAppनं 2016मध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लॉन्च केलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीनं Android यूझर्ससाठी Google ड्राइव्ह आणि iPhone यूझर्ससाठी iCloudवर संग्रहित केलेल्या चॅट बॅकअपसाठी सुरक्षा वाढवलीय. या वैशिष्ट्यांची घोषणा करताना, व्हॉट्सअॅपनं म्हटलं होतं, की व्हाट्सअॅप किंवा तुमचा बॅकअप सेवा प्रदाता तुमचा बॅकअप वाचू शकणार नाही किंवा ते अनलॉक करण्यासाठी आवश्यक ‘की’ अॅक्सेस करू शकणार नाही.”

Online Payments : ऑनलाइन पेमेंटच्या पद्धतीत 1 जानेवारीपासून होणार महत्त्वाचा बदल, जाणून घ्या…

VIDEO: महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Omicron Update: ओमिक्रॉनमुळेच देशात येणार तिसरी लाट? आधीपेक्षा तीव्र की सौम्य? तज्ज्ञांचा अंदाज वाचायलाच हवा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.