SIP की RD कुठे करावी गुंतवणूक? जाणून घ्या दोघांमधील फरक, कोण देतं अधिक परतावा
अनेकांना कुठे तरी गुंतवणूक करायची असते पण त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि त्यांना हवा तितका परतावा मिळत नाही. आरडी आणि एसआयपी या बाबतही अनेकांच्या मनात शंका आहेत. की योग्य गुंतवणूक कुठे करावी. या दोघांमधील फरक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

RD Vs SIP : तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम जमवायची असेल तर तुम्हाला बचत करावी लागेल. दर महिन्याला थोडी थोडी बचत करुन तुम्ही ती गुंतवू शकता. आज गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. पण अनेकांना गुंतवणूक कोठे करावी हे माहित नसते. काही लोकं एफडी, आरडी मध्ये गुंतवणूक करतात तर काही लोकं म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. पण एफडी करावी की एसआयपी याबाबत अजुनही अनेकांच्या मनात प्रश्न असतो. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत.
गुंतवणुकीसाठी या दोन्ही ठिकाणी एक हजार रुपयापासून सुरुवात होते. आरडी तुम्ही बँक किंवा पोस्टात सुरु करु शकतात. तर म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी डिमॅट अकाऊंट लागते. आरडी आणि एसआयपी दोघांचे फायदे आणि तोटे आहेत. यासाठी आम्ही दोंघामधला फरक सांगणार आहोत.
RD बद्दल जाणून घेऊ
RD बँकेत सुरू केल्यानंतर तुम्ही एका ठराविक काळासाठी निर्धारित केली जाते. प्रत्येक बँकेत वर्षानुसार व्याजदर वेगवेगळे असतात. या उलट पोस्टात जर तुम्हाला आरडी सुरु करायची असेल तर ती किमान पाच वर्षासाठी करावी लागते. आरडीचा फायदा असा आहे की तुम्हाला त्यात हमी परतावा मिळतो. ही एक सुरक्षित गुंतवणूक असल्याने बरेच लोक याची निवड करतात. बहुतेक लोक आरडीद्वारे जमा केलेले पैसे पुन्हा एफडी करतात. तुम्ही आरडी मध्येच बंद केली तर तुम्हाला दंड भरावा लागतो.
SBI मध्ये, RD वर 6.80% ते 7.00% पर्यंत व्याज मिळते. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर ६.७% दराने व्याज दिले जात आहे.
तुम्ही आरडीवर कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील घेऊ शकता. हे तुमच्या ठेव रकमेच्या 80 ते 90 टक्के असू शकते. आरडीच्या मुदतपूर्तीवर मिळालेल्या व्याजावर कर आकारला जातो. आरडीवरील व्याजाचे उत्पन्न 40,000 रुपयांपर्यंत (ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50,000 रुपये) असल्यास, तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास 10% TDS कापला जातो.
SIP बद्दल जाणून घेऊ
SIP बद्दल बोलायचे झाले तर RD प्रमाणे, तुम्ही SIP मध्ये छोट्या गुंतवणुकीसह देखील सुरुवात करू शकता. परंतु एसआयपीमध्ये बाजारात पैसे गुंतवले जातात, त्यामुळे परताव्याची खात्री देता येत नाही. परंतु तरीही बहुतेक तज्ञ एसआयपीला संपत्ती निर्मितीच्या दृष्टीने सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानतात. फंड मॅनेजर म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या पैशांचे व्यवस्थापन करतात. यामुळे धोका लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
RD प्रमाणे तुम्ही काही कालावधीसाठी SIP मध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवू शकता. यामध्ये लॉक इन पीरियडसारखे कोणतेही बंधन नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ती थांबवू शकता आणि पैसे काढू शकता. परंतु जर तुम्हाला SIP मधून चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्ही तो दीर्घकाळ चालू ठेवावा कारण याचा फायदा चक्रवाढीचा आहे आणि दीर्घकाळात जलद संपत्ती निर्माण होते.
तज्ञांच्या मते, SIP मध्ये सरासरी परतावा सुमारे 12 टक्के आहे. कधीकधी ते यापेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत पाहिले तर हा परतावा आरडीपेक्षा खूप जास्त आहे. दीर्घकालीन SIP द्वारे तुम्ही चांगला फंड तयार करू शकता.
एसआयपीमध्ये तुम्हाला रुपयाच्या सरासरी खर्चाचा फायदा मिळतो. याचा अर्थ असा की जर बाजार घसरत असेल आणि तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला जास्त युनिट्सचे वाटप केले जाईल आणि जर मार्केट तेजीत असेल तर तुम्हाला कमी युनिट्सचे वाटप केले जाईल. बाजार घसरला तरी तुमचे नुकसान होत नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा बाजार वाढतो तेव्हा तुम्हाला तुमच्या सरासरी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची संधी मिळू शकते.