तुमचा पैसा या बँकेत एकदम सुरक्षित, स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रमांक कितवा?

Government Bank | प्रत्येकाच्या तोंडी सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे नाव आहे. मग इतर बँक सुरक्षित नाहीत का? बँकिंग सुरक्षेचे नाव निघाले की, सर्वात अगोदर एसबीआयचे नाव निघते. एसबीआयबाबत ग्राहक डोळे झाकून ही बँक सुरक्षित असल्याची हमी देऊन टाकतात. मग इतर बँकांमध्ये कोणती बँक सुरक्षित आहे?

तुमचा पैसा या बँकेत एकदम सुरक्षित, स्टेट बँक ऑफ इंडियाचा क्रमांक कितवा?
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 3:55 PM

नवी दिल्ली | 22 डिसेंबर 2023 : सर्वसामान्य नागरिक सरकारी बँकांवर डोळे झाकून भरवसा ठेवतो. ते विना चिंता त्यांच्या कष्टाचा पैसा बँकांमध्ये बिनधास्तपणे जमा करतात. पण आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांत सरकारी बँकांसंबंधीच्या अनेक नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. सध्या खासगीकरणाचे वारे वाहत आहे. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून हिस्सेदारी विक्री करत आहे. तर काही वर्षात काही सरकारी बँक बंद करुन त्या दुसऱ्या बँकेत विलीन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणती बँक सर्वाधिक सुरक्षित याचा अंदाजा तरी कसा लावणार नाही का?

दोन प्रकारचे सरकारी बँक

देशात सध्या दोन प्रकारचे सरकारी बँक आहेत. एक एसबीआय आणि दुसऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँका. यामध्ये एक फरक आहे. एसबीआयची स्थापना स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा, 1955 अंतर्गत करण्यात आली आहे. यापूर्वी देशात या बँकेला इंपीरिअल बँक ऑफ इंडिया असे नाव होते. या बँकेची स्थापना इंग्रजांनी 1806 मध्ये केली होती. स्वातंत्र्यानंतर 1955 मध्ये बँकेचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अधिग्रहण करण्यात आले. या काळात कायद्याचा वापर करत काही खासगी बँका सरकारने पंखाखाली घेतल्या. तांत्रिक बाबी सोडल्या तर जवळपास या बँका सुरक्षेच्या दृष्टीने समानच म्हणाव्या लागतील.

हे सुद्धा वाचा

उदारीकरणानंतर बदलले नियम

यानंतर देशात 1991 मध्ये उदारीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. 1994 मध्ये बँकिंग कंपनी कायद्यात मोठा बदल झाला. कायद्यात सुधारणा होण्यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वच बँकांमध्ये सरकारची 100 टक्के हिस्सेदारी होती. 1994 मध्ये कायद्यात सुधारणा करण्यात आली. वाटा 51 पर्यंत आणण्यात आला. एसबीआय संपूर्ण देशात आरबीआयची प्रतिनिधी म्हणून काम करते. 1955 मधील कायद्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेतील हिस्सेदारी 55 टक्क्यांपेक्षा कमी नसेल.

कोणत्या बँकेत सरकारचा वाटा किती?

  • स्टेट बँकेत हा वाटा जवळपास 57.5 टक्के
  • बँक ऑफ बडोदामध्ये 63.97 टक्के हिस्सेदारी
  • कॅनेरा बँकेत सरकारचा वाटा 62.93 टक्के
  • पंजाब नॅशनल बँकेत हा वाटा 73.15 टक्के
  • इंडियन बँकेमध्ये सरकारचा हिस्सा 79.86 टक्के
  • युनियन बँक ऑफ इंडियामध्ये 83.49 टक्के वाटा
  • बँक ऑफ इंडियामध्ये 81.41 टक्के हिस्सा
  • सेंट्रल बँक ऑफ इंडियात 93.08 टक्के हिस्सेदारी
  • बँक ऑफ महाराष्ट्रात हा वाटा 85 टक्के आहे
  • युको बँकमध्ये सरकारचा वाटा 95.39 टक्के
  • इंडियन ओव्हरसीज बँकेत 96.38 टक्के वाटा
  • पंजाब अँड सिंध बँकेत 98.25 टक्के हिस्सा

कोणत्या बँका आहेत सुरक्षित

  1. बँकिंग नियमामुळे भारतीय बँकिंग क्षेत्र सुरक्षित
  2. आरबीआयचे सर्वच बँकिंग क्षेत्रावर नियंत्रण
  3. सुरक्षित बँकेत दीर्घकाळापासून एसबीआयाचा पहिला क्रमांक
  4. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर खासगी बँक एचडीएफसी, आयसीआयसीआय
  5. चौथ्या आणि पाचव्या स्थानी पीएनबी आणि बँक ऑफ बडोदा
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.